Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पोलिसांच्या पेट्रोल पंपातच कोट्यवधींचा घोटाळा; उपनिरीक्षकासह मुलगा न्यायालयीन कोठडीत !
    क्राईम

    पोलिसांच्या पेट्रोल पंपातच कोट्यवधींचा घोटाळा; उपनिरीक्षकासह मुलगा न्यायालयीन कोठडीत !

    editor deskBy editor deskMarch 18, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    पोलिस दलाच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या दक्षता पेट्रोलपंपावरील अपहार प्रकरणात अटकेत असलेल्या व्यवस्थापक उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ व त्यांचा मुलगा शेखर वाघ यांच्या पोलीस कोठडी संपली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्या पिता-पुत्रांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  जिल्हा पोलीस दलाच्या वेल्फेअर विभागातर्फे चालविल्या जाणाऱ्या दक्षता पेट्रोल पंपावरील व्यवस्थापक म्हणून नियुक्त असलेल्या उपनिरीक्षक वाल्मिक वाघ याने १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांचा अपहार केला होता. याप्रकरणी उपनिरीक्षक वाल्मीक वाघ व त्यांचा मुलगा शेखर वाघ या दोघांना अटक करण्यात आले आहे. वाघ यांच्याघराची झाडाझडती घेतल्यानंतर त्यांच्याकडून १२ लाख ७३ हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहे. त्या दोघ पिता-पुत्रांच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपली. त्या दोघांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्या दोघांची जळगाव कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘तू मला खुन्नस का दिली?’ म्हणत एकाला बेदम मारहाण !

    March 18, 2026

    ‘गुड बाय’ स्टोरीनंतर धरणगांवच्या विद्यार्थ्याचा जळगावात अंत !

    March 18, 2026

    स्टॅम्पवर काळाबाजार : ५ हजारांच्या स्टॅम्पसाठी ५००ची लाच घेताना दोघे रंगेहाथ जाळ्यात !

    March 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.