Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चाळीसगाव हादरले! शेडमध्ये सुटली गोळी, रिक्षाचालक गंभीर जखमी
    क्राईम

    चाळीसगाव हादरले! शेडमध्ये सुटली गोळी, रिक्षाचालक गंभीर जखमी

    editor deskBy editor deskMarch 17, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    शहरातील हनुमानवाडी परिसरात १५ रोजी रात्री झालेल्या गोळीबारात एका रिक्षाचालकाला गोळी लागून तो गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी ५ जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न व शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या घटनेत रेल्वे स्टेशनजवळच्या अनिल नगरमधील सिकंदर शेख निसार शेख (वय ३६) हा रिक्षा चालक जखमी झाला आहे. या प्रकरणात सिकंदर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंकित महेंद्र मोरे, मेहुल रत्नपाल गोरे, कृष्णा जिभाऊ शेळते (सर्व रा. चाळीसगाव) तसेच अन्य दोन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे ८.३० वाजेच्या सुमारास हनुमानवाडी येथील एका शेडमध्ये आरोपींकडे दोन गावठी कट्टे होते. त्यावेळी एका आरोपीने कद्वयाचा ट्रिगर दाबल्याने गोळी सुटून ती सिकंदर शेख यांच्या उजव्या खांद्यावर लागली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी चाळीसगाव सिटी पोलीस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न व शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमागील कारणांचा तपास केला जात आहे. दरम्यान, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी व त्यांच्या पथकाकडून तपास सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    . नाशिक हादरले : ५८ व्हिडिओंसह तथाकथित गुरूचा काळा कारनामा उघड !

    March 19, 2026

    बोगस फळबाग दाखवून ६ कोटींचा विमा घोटाळा; धरणगावात ५ सीएससी सेंटरवर गुन्हा

    March 19, 2026

    चिंचोलीत दुचाकींची समोरासमोर धडक; चिमुकल्यासह पाच जखमी

    March 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.