भुसावळ : प्रतिनिधी
भुसावळ बाजार पेठ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशानुसार, वरणगाव पोलीस स्टेशन हद्दीत स्थागुशा पथकाने मोठ्या कारवाईत यश मिळवले आहे. पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने संजय गोपाल चंदेले (वय ५०, ऑडन्स फॅक्टरी, वरणगाव) याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपीकडून एक सिल्वर रंगाची गावठी पिस्तूला (कट्टा) आणि दोन पितळी राऊंड जप्त केले, ज्याची एकूण किंमत अंदाजे २७०० रुपये आहे. हा मुद्देमाल स्थानिक सुरक्षा आणि गुन्हेगारी प्रतिबंधासाठी ताब्यात घेतला गेला आहे.
पोलीस पथकातील अधिकारी पोलिस प्रेमचंद सपकाळे, सलीम तडवी, उमाकांत पाटील, श्रीकृष्ण देशमुख, रविंद्र चौधरी, छगन तायडे, रतन गिते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील चौकशी सुरू आहे. आरोपीस मुद्देमालासह वरणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात ठेवण्यात आले आहे. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढली आहे. पोलीसा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, शस्त्रसंबंधी माहिती किंवा संशयास्पद हालचाली असल्यासा त्वरित पोलीसांना कळवण्याचा सल्ला दिला आहे.



