जळगाव : प्रतिनिधी
नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. ३१ वर्षीय महिलेला गुंगीकारक पेय देऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध एआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १३ मार्च ते १४ मार्च रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील एका भागात एका महिलेला दोन संशयित आरोपींनी संगनमत करून पिडीत महिलेला थंड पेयामधून गुंगीकारक औषध दिले. महिला शुद्धीवर नसल्याचा फायदा घेत राजेश शिवराम पवार आणि राजेंद्र शंकरसिंह पवार यांनी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. पिडीत महिला ही आरोपींची नातेवाईक आहे.
हा प्रकार पीडीत महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून आपली फिर्याद दिली. त्यानुसार पोलीसांनी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास सपोनि गणेश वाघ आणि सपोनि माधुरी बोरसे करत आहेत.



