Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वरसाडे तांड्यातील बेपत्ता तरुणाच्या खुनाचा उलगडा; प्रेमसंबंधातून पती-पत्नीने रचला कट
    क्राईम

    वरसाडे तांड्यातील बेपत्ता तरुणाच्या खुनाचा उलगडा; प्रेमसंबंधातून पती-पत्नीने रचला कट

    editor deskBy editor deskMarch 15, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा : प्रतिनिधी

    तालुक्यातील पिंपळगाव हरे पोलीस ठाणे हद्दीतील वरसाडे तांडा येथे बेपत्ता झालेल्या तरुणाच्या प्रकरणाचा तपास करताना धक्कादायक सत्य समोर आले असून प्रेमसंबंधातून या तरुणाची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी पती- पत्नीला अटक केली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  पाचोरा तालुक्यतील वरसाडे तांडा येथील संजय दिलेल्या माहितीनुसार त्यांचा भाऊ विजय भिमा राठोड (वय २५) हा २४ फेब्रुवारीला भिमा राठोड (वय ३३) यांनी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास राहत्या घरातून कुणालाही काहिही न सांगता बाहेर गेला होता. त्यानंतर त्याचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तो कोठेच मिळाला नाही. त्यामुळे पिंपळगाव हरे पोलीस ठाण्यात २६ रोजी हरवल्याची (१५/२०२६ नुसार) नोंद करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा व त्यांच्या पथकाने सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे या प्रकरणात संजय परशुराम जाधव याची चौकशी करण्यात आली. सुरुवातीला आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत होता.

    मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच चौकशीत त्याने धक्कादायक माहिती दिली अन् या तपासात खुनाचे गुपीत उघड झाले. या प्रकरणात पोलिसांनी पत्नी व पती या दोघांना अटक केली असून पाचोरा न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा करत आहेत. संजय जाधव याची पत्नी सोनाली जाधव हिचे मयत विजय राठोड याच्यासोबत प्रेमसंबंध होते. या संबंधातून विजय राठोड याने सोनालीचे काही अश्लील व्हिडिओ मोबाईलमध्ये काढले होते. तसेच त्याद्वारे तो तिला धमकावत होता. ही माहिती समजल्यानंतर संजय जाधव याने पत्नी सोनालीसह विजय राठोड याची हत्या केली. त्यानंतर त्या तरुणाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली दिली.

    ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. या तपासात सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्यासह पोउनि विठ्ठल पवार, पो. हे. कॉ. किरण ब्राह्मणे, अतुल पवार, अभिजित निकम, राहुल बेहरे, पांडुरंग गोरबंजार, अमोल पाटील, नामदेव इंगळे, भारत पाटील, दीपक अहीरे व सागर पाटील यांनी सहकार्य केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कुंभमेळ्यावरून मंत्री नीतेश राणेंचे वादग्रस्त विधान; ‘हिंदूंव्यतिरिक्त स्टॉल नको’

    March 15, 2026

    वडिलांना मारहाण केल्याचा राग; वाल्मिक नगरात तिघांवर दोन राऊंड फायर, संशयित अटकेत !

    March 15, 2026

    धावत्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे अँगल तुटले : वढोदा जवळ अपघातात एक ठार, तिघे जखमी

    March 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.