Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मिनी ट्रकला भीषण आग; तीन स्फोट, चालकाची प्रसंगावधानाने जीवितहानी टळली
    क्राईम

    मिनी ट्रकला भीषण आग; तीन स्फोट, चालकाची प्रसंगावधानाने जीवितहानी टळली

    editor deskBy editor deskMarch 14, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    ऑक्सिजन आणि केमिकलसह औद्योगिक साहित्य वाहून नेणाऱ्या मिनी ट्रकला भीषण आग लागून तीनवेळा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. स्फोटांच्या आवाजामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखून ट्रकमधून उडी मारल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही थरारक घटना तालुक्यातील भुसावळ-जामनेर मार्गावर कुन्हे पानाचे गावाजवळ शुक्रवारी सकाळी ११:१५ वाजता घडली. दरम्यान, ट्रकला आग लागल्याचे लक्षात येताच चालक उमेश रमेश जाधव (रा. हातनूर, ता. कन्नड, जि. संभाजीनगर) यांनी प्रसंगावधान राखून तत्काळ ट्रकमधून उडी मारून स्वतःचा जीव वाचविला.

    मिळालेल्या माहितीनुसार, मिनी ट्रक (क्र. एमएच २० ईएल ८४६७) हा औद्योगिक साहित्य, सिलिंडर तसेच इतर साहित्य घेऊन जात होता. शुक्रवारी (दि. १३) सकाळी सुमारे ११:१५ वाजण्याच्या सुमारास कुन्हा ते जामनेर मार्गावर हॉटेल राजगडसमोर ट्रकच्या मागील भागातील सामानाला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले. आग लागल्यानंतर ट्रकमधील टँकचे तीन मोठे स्फोट झाले. या स्फोटांमुळे मोठा आवाज होऊन परिसर हादरला. स्फोटांचा धोका लक्षात घेऊन जामनेर-भुसावळ मार्गावरील वाहतूक तातडीने थांबवण्यात आली. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सुमारे दोन तास हा मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.

    घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्याचबरोबर जामनेर येथील अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. भुसावळ नगरपरिषदेच्या अग्निशमन दलानेही तत्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मोठ्या शर्थीने अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी भुसावळ नगरपरिषदेचे अग्निशमन अधिकारी विवेक माकोडे, कर्मचारी गजेंद्र जावळे तसेच अन्य अग्निशमन कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जुन्या वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला !

    March 14, 2026

    जळगावात प्रौढाने संपविले आयुष्य !

    March 14, 2026

    खळबळजनक : १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग !

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.