Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बाथरूममध्ये करंटचा धक्का; ४४ वर्षीय कारागिराचा मृत्यू
    क्राईम

    बाथरूममध्ये करंटचा धक्का; ४४ वर्षीय कारागिराचा मृत्यू

    editor deskBy editor deskMarch 12, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा :  प्रतिनिधी

    बाथरूममध्ये वाॅटर हिटरचा शाॅक लागल्याने एका ४४ वर्षीय फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शहरातील हनुमान नगर येथे घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  धनराज सुखदेव मिस्तरी (वय – ४४ वर्ष) रा. ए वन काट्याजवळ, हनुमान नगर, पाचोरा असे मयताचे नाव असुन धनराज मिस्तरी हे ११ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांचे घराच्या बाथरूममध्ये अंघोळीसाठी गेले असता बाथरूममध्ये असलेल्या वाॅटर हिटरचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. धनराज मिस्तरी यांना तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी धनराज मिस्तरी यांना मृत घोषित केले.

    घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पो. नि. राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. काॅ. संदिप राजपूत हे करीत आहेत. धनराज मिस्तरी यांचे पाश्चात्य वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन बहिणी असा परिवार आहे. अत्यंत शांत व मनमिळाऊ स्वभावाचे धनराज मिस्तरी यांच्या अकस्मात मृत्यूने हनुमान नगर सह परिसरात शोककळा पसरली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मुंबई विधानभवनात सुरक्षिततेसह खळबळ; ई-मेलद्वारे धमकी आल्याने सतर्कता

    March 12, 2026

    पाळधीत एका रात्रीत दोन घरफोड्या; दागिने-रोख रक्कम लंपास !

    March 12, 2026

    जुन्या वादातून प्रौढावर हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा, दोघांना अटक

    March 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.