जळगाव : प्रतिनिधी
शहरात एकतर्फी प्रेमातून एका १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना ९ मार्च रोजी घडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित तरुणीच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सलमान सगीर काकर याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी ८ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पीडित तरूणी ही तांबापुरा परिसरातून जात असताना संशयित आरोपी सलमान सगीर काकर याने पीडित तरुणीचा पाठलाग करीत तरुणीकडे लग्नाची मागणी केली. पीडितेने याला विरोध केला असता, आरोपीने तिला धमकी धमकीही दिली. तपास पोलिस हवालदार गणेश वंजारी करत आहेत.



