चाळीसगाव : प्रतिनिधी
व्हिडिओ कॉलद्वारे १९ वर्षीय विद्यार्थ्यांचा विवख व्हिडिओ करून ब्लॅकमेल करीत त्याच्याकडून ५ लाख ९५ हजार ४५० रुपये उकळले. हा धक्कादायक प्रकार ५ सप्टेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या दरम्यान घडला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात ५ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव येथील १९ वर्षीय तरुण नाशिक येथे बीसीएसच्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे. ५ सप्टेंबर रोजी तो फेसबुक पाहत असताना त्याने ‘ऑनलाईन मुलींशी बोलण्याकरीता खालील लिंकवर क्लिक करा’ अशा मेसेजला क्लिक केले. त्यानंतर एक अॅप ओपन झाले व त्यात मुलींच्या नावाचे वेगवेगळे खाते दिसले. यापासून वाचायचे असल्यास व्हिडिओ डिलिट करण्यासाठी डिलीट कार्ड लागेल व त्यासाठी पैशांची मागणी केली. त्यानुसार घाबरून सदर विद्यार्थ्याने समोरील व्यक्तीने पाठविलेल्या पेमेंट लिंकवर वेळोवेळी एकूण ५ लाख ९५ हजार ४५० रुपये पाठविले.
फसवणूक झालेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांचे चाळीसगाव येथे छोटेसे दुकान आहे. त्यांच्याच बँक खात्यातील रक्कम या विद्यार्थ्याने पाठविली. काही दिवसांनी हा प्रकार त्याने घरी सांगितला. या विषयी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली व फसवणूक करणारी महिला तोतया पोलिस अधिकाऱ्याविरुद्ध गुन्ह दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराड करीत आहेत.
काही वेळाने एका क्रमांकावरून या विद्यार्थ्यास ‘हाय’ मेसेज आला. त्यावर त्याने रिप्लाय दिला नाही, मात्र त्याला त्याच क्रमांकावरून व्हिडिओ कॉल आला. त्यात समोरील महिला विवस्त्र होती व ती अश्लील हातवारे करीत होती. काही वेळाने सदर विद्यार्थ्यानेही त्याच्या अंगावरील सर्व कपडे काढून विवख झाला. १० मिनिटांच्या कॉलदरम्यान महिला वारंवार तेच ते बोलू लागल्याने विद्यार्थ्याने कॉल कट केला. विद्यार्थ्याने कॉल कट केल्यानंतर महिलेने विद्यार्थ्यांचा विवख व्हिडिओ त्याला पाठविला. हा व्हिडिओ व्हायरल होऊ द्यायचा नसेल तर २ हजार रुपये दे, असा मेसेज पाठविला. सदर विद्यार्थी गावी निघून आला असताना ९ सप्टेंबर रोजी त्याला कॉल आला व दिल्ली सायबर येथून एसपी राम पांडे बोलत असल्याचे सांगून विवख होऊन तुम्ही एका महिलेला व्हिडिओ कॉल केल्याची तक्रार आल्याचे सांगितले.



