Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भाचीच्या लग्नातील दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला; तिघांना अटक
    क्राईम

    भाचीच्या लग्नातील दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला; तिघांना अटक

    editor deskBy editor deskMarch 3, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    भाचीच्या लग्नासाठी आत्याने घरात ठेवलेले २ लाख ८ हजार रुपयांचे दागिने भाच्यानेच लांबविले. हा प्रकार २६ फेब्रुवारी रोजी राजीव गांधी नगरमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी १ मार्च रोजी तीन जणांना अटक करण्यात आले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, राजीव गांधी नगरमधील सुनीता वामन लोंढे (३४) यांनी भाचीच्या लग्नासाठी २ लाख ८ हजार रुपये किमतीचे दागिने पेटीत ठेवले होते. २६ फेब्रुवारी रोजी त्यांना दागिने ठेवलेली पेटी दिसली नाही. त्याविषयी त्यांनी भाचीला विचारला केली असता मध्यरात्री समाधान लोंढे हा घराच्या बाहेर जाताना दिसल्याचे सांगितले. समाधानला विचारणा केली असता त्याने मित्रांसह पेटी व त्यातील दागिने नेल्याचे सांगितले. त्याच्याकडे मागणी करूनही त्याने दागिने दिले नाही. त्यावरून समाधान लोंढे, प्रेम सकट, निखिल हातग या तीन जणांना पोहेकॉ जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, जितेंद्र राजपूत, नीलेश पाटील यांनी अटक केली. साहील अवचारे हा पसार झाला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

    March 3, 2026

    मध्यपूर्वेत युद्धज्वाला; दुबई विमानतळ ठप्प, प्रवाशांचा थरारक अनुभव

    March 3, 2026

    चाकूचा धाक दाखवून चौघांनी रक्कम लांबविली !

    March 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.