Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव मनपात दोन्ही सभापती बिनविरोध; डॉ.चंद्रशेखर पाटलांचा अर्ज दाखल !
    जळगाव

    जळगाव मनपात दोन्ही सभापती बिनविरोध; डॉ.चंद्रशेखर पाटलांचा अर्ज दाखल !

    editor deskBy editor deskFebruary 26, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव शहर महानगरपालिका येथील सत्तेच्या चाब्या मानल्या जाणाऱ्या ‘स्थायी समिती’ आणि ‘महिला व बालकल्याण समिती’च्या सभापतीपदासाठी गुरुवारी (दि. २६ फेब्रुवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक आता केवळ औपचारिकता उरली असून उमेदवार बिनविरोध निवडून येणार हे स्पष्ट झाले आहे.

    स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी भारतीय जनता पक्षतर्फे डॉ. चंद्रशेखर शिवाजी पाटील यांनी एकमेव अर्ज दाखल केला. तर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी शिवसेनाच्या ज्येष्ठ नगरसेविका सिंधुताई विजय कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. दोन्ही उमेदवारांनी विहित वेळेत नगरसचिव सतीश शुक्ला यांच्याकडे अर्ज सुपूर्द केले.

    अर्ज दाखल करताना महापालिका परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली होती. दोन्ही पक्षांचे नेते, नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवारांना पाठिंबा दर्शवत होते. घोषणाबाजी आणि अभिनंदनाच्या फलकांमुळे परिसरात उत्सवी वातावरण पाहायला मिळाले.

    भाजपतर्फे गटनेता प्रकाश बालाणी, उपगटनेता नितीन बरडे, स्थायी समिती सदस्य दीपक सूर्यवंशी, विशाल भोळे, सुरेश सोनवणे, अरविंद देशमुख, कल्पेश सोनवणे, मानसी भोईटे, वंदना इंगळे, नितीन सपके आदी उपस्थित होते. महिला व बालकल्याण समिती सदस्य सुरेखा तायडे, रंजना वानखेडे, पूजा जगताप, विद्या सोनवणे, गायत्री राणे यांनीही हजेरी लावली. शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, दिलीप पोकळे, नरेंद्र पाटील, गणेश सोनवणे, समिती सदस्य प्रतिभा देशमुख, डॉ. अमृता सोनवणे तसेच नगरसेवक प्रवीण कोल्हे आणि पियुष कोल्हे उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.