Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..
    जळगाव

    मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..

    editor deskBy editor deskSeptember 27, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव  : प्रतिनिधी 

    जैन हिल्सच्या निसर्गरम्य परिसरात उगवत्या सूर्याच्या साक्षीने जळगावकरांनी धावपळीच्या जीवनशैलीतून काही क्षण स्वतःसाठी काढत शरीर आणि मनाला नवचैतन्य देणारा ‘Sunrise & Surrender – The Morning Journey’ हा अनोखा उपक्रमाची अनुभूती घेतली. ‘The Unplug Project’ च्या माध्यमातून केवळ निसर्गभ्रमंती, ध्यान, लाइव्ह म्युझिक, डान्स त्यानंतर उत्तम खाद्यसंस्कृती यांचा अनुभव देणारी सकाळची खास जर्नी प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरली.

    निसर्गरम्य परिसरात Scenic Run आणि Nature Walk सोबत ध्यान, लाइव्ह म्युझिक आणि फ्री-फ्लो डान्सचा आनंद सहभागींना घेतला. ‘Not just a run. Not just a party.’ या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश शरीरासोबत मनालाही ताजेतवाने करणे हा होता. ‘Move, Breathe, Dance, Belong’ या भावनेतून जळगावकरांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला होता. यामध्ये कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, जिल्हाधिकारी रोहन घुगे, मनपा आयुक्त आदित्य जिवने, जिल्हा परिषदेच्या सीईओ करिश्मा नायर, उपवनसंरक्षक सौरेश सहाय, उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सौ. ज्योती जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, सौ. निशा जैन, शोभना अजित जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, डॉ. भावना जैन, क्रेडाईचे राज्यउपाध्यक्ष अनिश शहा, यामिनी शहा, डॉ. जयवंत नागूलकर, डॉ. कल्याणी नागूलकर, प्रेम कोगटा, अथांग जैन, अंबिका जैन, अभेद्य जैन, आंचल जैन यांच्यासह मान्यवरांनी सहभाग घेतला.

    जळगावकरांना ‘रन’पलीकडचा अनुभव!

    ‘फक्त धावणे नाही, फक्त पार्टीही नाही’ या संकल्पनेतून साकारलेल्या उपक्रमाने व्यायाम, निसर्ग, संगीत आणि नृत्याचा अनोखा मिलाफ घडवला. शरीरासोबत मनालाही ताजेतवाने करणाऱ्या या उपक्रमातून ‘चला, हालचाल करूया, श्वास घेऊया, नाचूया आणि एकत्र येऊया’ हा संदेश देण्यात आला. अंबिका जैन, जयंतिका आणि सनम यांच्या पुढाकारातून जळगावकरांना पहिल्यांदाच अशा आगळ्यावेगळ्या उपक्रमाची अनुभूती मिळाली.

    ‘Music पासून Meditation पर्यंतची अनोखी रंगत..
    अहमदाबाद येथील नामवंत आर्टिस्ट पारस दलाल यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या सादरीकरणामुळे सकाळच्या या अनुभवाला संगीत आणि मनोरंजनाची वेगळी रंगत मिळाली. आजची सकाळ जळगावकरांसाठी ‘Run पासून Relaxation पर्यंत’ आणि ‘Music पासून Meditation पर्यंत’ चा नवा अनुभव देऊन गेली. श्रद्धेय मोठ्याभाऊंच्या श्रद्धाज्योत या श्रद्धास्थळापासून मॉर्निग जर्नीला सुरवात झाली. येथून श्रद्धाधाम परिसरात बोटींमध्ये तबला वादन, क्लासीकल पियानो वादन सह मंगोलियन साऊंडच्या माध्यमातून निसर्गाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला गेला. ध्यान योगातून मन:शांतीचा प्रयत्न केला गेला. अंबिका जैन यांनी सर्वांचे आभार मानले. तर डॉ. अश्विन झाला यांनी परिसराची माहिती दिली. यशस्वीतेसाठी अंबिका जैन यांच्यासह, जयंतिका आणि सनम, जगदीश चावला यांनी विशेष परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पार्किंगमधून दुचाकी लंपास; सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरटा जेरबंद

    September 27, 2026

    रेल्वेच्या धडकेत ४५ वर्षीय व्यावसायिकाचा दुर्दैवी मृत्यू!

    September 27, 2026

    धरणगाव : अल्पवयीन मुलगी गर्भवती; ४३ वर्षीय आरोपी अटकेत !

    September 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.