Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर
    राज्य

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 21, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सरपंच परिषदेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून भाजपा–शिवसेना युती सरकारने विद्यमान सरपंचांना प्रशासक म्हणून सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रलंबित कामांना गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


    सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष निर्दोष पवार, उपाध्यक्ष कैलास पाटील, सुरेश पवार तसेच बांभोरीचे सरपंच सचिन भाऊ बिराडे यांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत सर्व सरपंचांच्या वतीने आभार मानले. त्यांनी सांगितले की, ग्रामविकासाची कामे अर्धवट राहू नयेत आणि प्रशासनात सातत्य राहावे यासाठी परिषदेकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.


    याबाबत सर्व पदाधिकारी व सरपंचांनी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विशेष आभार मानले. त्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळेच शासनाने हा निर्णय घेतल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
    दरम्यान, मुदतवाढ मिळाल्यामुळे ग्रामपंचायतींमधील विकासकामे, प्रलंबित योजना आणि निधीवाटप प्रक्रियेला वेग मिळेल, असा विश्वास सरपंचांनी व्यक्त केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.