Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शेतकऱ्यांच्या हितासाठी गुलाबराव पाटील यांचा दमदार निर्णय; 60 हजारांना दिवसा वीज!
    धरणगाव

    शेतकऱ्यांच्या हितासाठी गुलाबराव पाटील यांचा दमदार निर्णय; 60 हजारांना दिवसा वीज!

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 13, 2026Updated:February 13, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बिलखेडा येथे 33/11 केव्ही नवीन उपकेंद्राचे भूमीपूजन ; AIIB योजनेतून जळगाव ग्रामीणला 32 कोटींची वीज बळकटीकरणाची गती

    पाळधी/धरणगाव प्रतिनिधी | दि. 13 फेब्रुवारी – मुख्यमंत्री कृषी सौर योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकरी व ग्रामीण भागातील वीज पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. जळगाव ग्रामीण मतदारसंघात विकासाची गती कायम ठेवून नागरिकांना दर्जेदार सुविधा देणे हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते धरणगाव तालुक्यातील बिलखेडा येथे 33/11 केव्ही क्षमतेच्या नवीन वीज उपकेंद्राच्या भूमीपूजन प्रसंगी बोलत होते.

    शासनाच्या Asian Infrastructure Investment Bank (AIIB) योजनेअंतर्गत जळगाव ग्रामीण मतदारसंघातील वीज वितरण व्यवस्था बळकट करण्यासाठी सुमारे रु. 32 कोटींच्या उपकेंद्र, ट्रान्सफॉर्मर व वीज वाहिन्यांच्या कामांना मंजुरी मिळाल्याने ग्रामीण भागातील वीज पुरवठ्यास मोठा आधार मिळणार आहे. यामुळे शेती, लघुउद्योग तसेच घरगुती ग्राहकांना अखंड व सुरळीत वीज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

    जळगाव ग्रामीण मतदारसंघातील मंजूर कामे
    रु. 8.17 कोटी खर्चातून शिरसोली, भोणे-बिलखेडे, जळगाव खुर्द व टाकरखेडा येथे 4 नवीन उपकेंद्रे
    रु. 4.20 कोटी निधीतून भादली बु., बोरगाव, चांदसर व सोनवद येथे 4 अतिरिक्त रोहीत्र
    रु. 3.67 कोटी खर्चातून 89 ठिकाणी 100/200 केव्हीए नवीन रोहीत्र
    रु. 1.35 कोटी निधीतून 43 ठिकाणी रोहीत्र क्षमतावाढ
    रु. 1.14 कोटी निधीतून पाळधी उपकेंद्राची क्षमतावाढ
    रु. 13.56 कोटी निधीतून 10 ठिकाणी शेतीपंप व गावठाण वीज वाहिनी विलगीकरण

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपकार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील यांनी केले. त्यांनी मंजूर 33/11 केव्ही उपकेंद्र व संबंधित वीज वितरण कामांची माहिती दिली. सूत्रसंचालन युवा सेनेचे भैया मराठे यांनी केले तर आभार बापू भदाणे सर व शाखा प्रमुख गोपाल भदाणे यांनी मानले.

    या नवीन उपकेंद्रामुळे बिलखेडा, भोणे, जांभोरे व सार्वे परिसरातील सुमारे 750 शेती ग्राहकांना दिवसा 8 तास वीज तसेच 1,235 घरगुती ग्राहकांना 24 तास वीजपुरवठा उपलब्ध होणार असून ग्रामस्थ व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

    प्रमुख उपस्थिती
    वीज वितरणचे कार्यकारी अभियंता निलेश सोनगीरे, इन्फ्राचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन पाटील, उपकार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, माजी सभापती प्रेमराज पाटील, मुकुंदराव नन्नवरे, अनिल पाटील, भाजपचे डी. जी. पाटील, सुभाषअण्णा पाटील, माजी जि. प. सदस्य माधुरीताई अत्तरदे, ठेकेदार सुजित पाटील, रा. कॉ. चे ज्ञानेश्वर महाजन, उपसरपंच दिलीप भदाणे, देविदास भदाणे, युवासेनेचे दीपक भदाणे, शाखा प्रमुख गोपाल भदाणे, आखाडू सोनवणे, शेतकी संघाचे गजानन पाटील, समाधान पाटील, रवी चव्हाण सर, विलास महाजन, भानुदास विसावे यांच्यासह परिसरातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    धरणगावात महाशिवरात्री निमित्त भव्य शिवमहोत्सव; 21 आकर्षक झाक्यांची मिरवणूक

    February 11, 2026

    धरणगावात बेकायदेशीर राहणाऱ्या इराणी महिलेची होणार भारतातून हकालपट्टी !

    February 3, 2026

    धरणगाव तालुक्यात वादळ-पावसाचा कहर; रब्बी पिके भुईसपाट

    January 31, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.