Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बारामती विमान अपघात: सीआयडी तपास गतीने सुरू, तांत्रिक व मानवी घटकांचा शोध
    क्राईम

    बारामती विमान अपघात: सीआयडी तपास गतीने सुरू, तांत्रिक व मानवी घटकांचा शोध

    editor deskBy editor deskFebruary 7, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती विमान अपघात प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) तपासाला गती दिली आहे. या तपासात महत्त्वाचा भाग म्हणून त्यांच्या खासगी सचिवांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

    अजित पवार मुंबईहून बारामतीकडे खासगी विमानाने रवाना झाले होते. मात्र बारामती विमानतळाजवळ धावपट्टीवर विमान कोसळले आणि यात पाच जणांचा मृत्यू झाला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसल्यामुळे सरकारने सखोल चौकशीचे आदेश दिले.

    सीआयडीने अजित पवार यांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांची सविस्तर चौकशी चार तासांपेक्षा जास्त वेळ चालवली. चौकशीत बारामती दौऱ्याचे नियोजन, प्रवासाचा आराखडा, विमान प्रवासाची तयारी आणि अपघाताच्या अगोदर झालेल्या चर्चांचा तपशील नोंदवण्यात आला.

    सीआयडी तपास तांत्रिक बिघाड, मानवी चूक किंवा इतर संभाव्य कारणे यावर केंद्रित आहे. अपघाताचे मूळ कारण शोधण्यासाठी विमानाचे वेग, उंची, इंजिन तापमान, हवेचा दाब, पंखांची हालचाल, पायलट संवाद यासह सर्व तांत्रिक घटक तपासले जात आहेत. तसेच विमानाचे अवशेष प्रयोगशाळेत पाठवून सखोल विश्लेषण केले जाणार आहे. सीआयडीचे अधिकारी राजकीय संशय व सर्व शक्य कारणे तपासात समाविष्ट करत आहेत. तपास तीन टप्प्यात होणार असून, पहिल्या टप्प्यात तांत्रिक माहिती गोळा, दुसऱ्या टप्प्यात विमान अवशेषांचे विश्लेषण, आणि तिसऱ्या टप्प्यात संपूर्ण निष्कर्ष काढण्याचे नियोजन आहे. राज्यभरातून या तपासाकडे लक्ष लागले असून, अपघाताचे नेमके कारण लवकरच उघड होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दिंडोरीत भीषण दुर्घटना; कार विहिरीत कोसळून ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू, एकाच कुटुंबावर काळाचा घाला

    April 4, 2026

    सिक्युरिटी इन्चार्जने सिक्युरिटी गार्ड महिलेवर केला अत्याचार !

    April 4, 2026

    अमळनेरमध्ये ‘मृत्यूचा गतिरोधक’ : उंच स्पीड ब्रेकरमुळे महिलेचा दुर्दैवी मृत्यू; नागरिकांत संताप

    April 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.