Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावच्या तरूणाच्या खिश्यातील ५५ हजारांची रोकड लांबविली
    क्राईम

    धरणगावच्या तरूणाच्या खिश्यातील ५५ हजारांची रोकड लांबविली

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 12, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगावातील खोटे नगरजवळील घटना; रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    जळगाव प्रतिनिधी । जुनी दुचाकी घेण्यासाठी जळगावात आलेल्या तरूणाच्या खिशातून ५५ हजार रूपयांची रोकड रिक्षातून चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, रूपेश रमेश भाटीया (वय-३२) रा. भाटीया गल्ली धरणगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. आगरबत्ती विक्री व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतो. व्यवसाय करण्यासाठी त्याला जुनी दुचाकी घेण्यासाठी २८ मे रोजी जळगावात आला होता. त्यावेळी रूपेशने ५५ हजार रूपये सोबत आणलेले होते. जळगावात आल्यानंतर त्याचा मित्र मनोज वाणी याला भेटून गणेश कॉलनीतील ख्वॉजामियॉ येथे त्याला जुन्या दुचाकी पसंत पडल्या नाहीत. दोघेजण दुचाकीने आकाशवाणी चौकात आले. धरणगाव जाण्यासाठी रूपेश रिक्षात बसला. खोटेनगर पर्यंत रिक्षात जात असतांना त्याचा मित्रांच्या सांगण्यावरून रूपेश खाली उतरला. व रिक्षा निघून गेली. त्यानंतर खिश्यातील पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आले. दोघांनी धरणगावपर्यंत शोध घेतला परंतू कुठेही मिळून आले नही. कामात व्यस्त असल्याने त्त्यांनी पोलीसात तक्रार दिली नाही. दरम्यान, ९ जुलै रोजी त्यांनी एका न्यूज पोर्टलवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रिक्षात चोरी करणाऱ्यांना पकडले ही प्रसारीत केलेली बातमी वाचली. बातमीत दिलेले आरोपीचे फोटो पाहिल्यावर रूपेशच्या लक्षात आले की, याच रिक्षा चालकाने त्याच्या खिश्यातून पैसे लांबविल्याचे समोर आले दिसून आले. रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रेवानंद साळुंखे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    २० वर्षीय तरुणीचा मृतदेह रिक्षातून आढळला; पालकांचा धक्कादायक दावा

    February 20, 2026

    “मी दादागिरी करणारच” वक्तव्याने पेटला वाद; सपोनि चौधरी नियंत्रण कक्षात

    February 20, 2026

    चौघांनी केली तरुणावर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने मारहाण !

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.