Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » लग्नात पिस्तूल-तलवारीसह नाचण्याचा थरार; व्हायरल व्हिडीओनंतर धरणगाव पोलिसांची बीडमध्ये धाव !
    क्राईम

    लग्नात पिस्तूल-तलवारीसह नाचण्याचा थरार; व्हायरल व्हिडीओनंतर धरणगाव पोलिसांची बीडमध्ये धाव !

    editor deskBy editor deskDecember 31, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    एका लग्न समारंभात हातात पिस्तुल व तलवार घेवून नाचणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायर झाला आहे. हा व्हिडीओ धरणगाव येथील गॅस गोडावून असल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडीओची तात्काळ गंभीररित्या दखल घेत पोलिसांचे एक पथक संशयिताच्या शोधार्थ बीड येथे रवाना करण्यात आले असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव येथील भारत गॅस गोडावूनजवळ विवाह सोहळा होता. या सोहळ्याला पाहुणे म्हणून आलेल्या तरुणांकडून डिजेवर गाणे लावून नाचत होते. यावेळी पोलिसांसारखा पेहराव असलेल्या एका इसमाने त्याच्याजवळील असलेले पिस्तुल दुसऱ्या तरुणाच्या हातात दिले. त्यानंतर तो तरुण ते पिस्तूल हातातवर करुन जलने वालो को जलने दे या गितावर तर त्याच ठिकाणी दुसरा युवक हा हातात तलवार घेवून तो बाप तो बाप रहे गा या गितांवर नाचत दहशत माजवितांना दिसून आला. लग्नात असलेल्या पाहुणे मंडळींनी तो व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

    सोशल मीडियावर व्हायर झालेल्या व्हिडीओ माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी लागलीच हा व्हिडीओची सत्यता पडताळण्याकरीता तो पोलीस अधीक्षकांना पाठविला. पोलिस अधीक्षकांनी त्या व्हिडीओची गंभीर रित्या दखल घेत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

    पोलीस अधीक्षकांचे आदेश मिळताच धरणगाव पोलिसांनी त्या व्हिडीओमध्ये पिस्तुल व तलवार घेवून नाचणाऱ्यांनी नावे निष्पन्न केली. त्यातील पिस्तुल घेवून नाचणारा तरुण हा बीड येथील असल्याचे समजले. तो इसम नातेवाईकांकडे लग्नाला आला होता. त्याच्या शोधार्थ धरणगाव पोलीसांचे पथक रवाना झाले असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    माजी मंत्री खडसे अडचणीत येणार ? सरकारने दिले एसआयटी चौकशीचे आदेश !

    March 11, 2026

    टॅनिंगचा त्रास वाढलाय? जाणून घ्या घरगुती सिरम बनवण्याची सोपी पद्धत

    March 11, 2026

    १३ वर्षांपासून कोमात, गाझियाबादच्या तरुणाला सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक इच्छामृत्यू निर्णय

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.