जळगाव : प्रतिनिधी
सलग दहा वर्ष प्रभावानंतर एरंडोल भडगाव विधानसभा मतदारसंघात 1995 ला पारोळ्याचे भाग्यविधाते कै. भास्करराव राजाराम पाटील यांना विधानसभा निवडणुकीत चष्मा ही निशाणी मिळाली होती त्या काळात भास्करराव आप्पा हे अपक्ष उमेदवार होते. सलग दहा वर्ष प्रभावानंतर जनतेमध्ये प्रचंड उत्साह होता आप्पा तुम्ही प्रचार करू नका आम्ही समोरच्यांची डिपॉझिट जप्त करतो अशी भाषा वापरली गेली. मतदार राजा ही शब्दाला जागले अखेर चार प्रमुख उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली.
आप्पा हे राज्यात पहिला क्रमांकाच्या मतांनी विजयी झाले . याच इतिहासाची पुनरावृत्ती पारोळा नगरपालिकेत होणार असून भास्करराव आप्पा यांच्या नातू सुन लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी अंजली करण पाटील व माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांची सून वर्षा रोहन पाटील या चष्मा या निशाणीवर आपले राजकीय भविष्य आजमावत आहेत. 35 वर्षानंतर भास्कर आप्पा यांच्या घराण्याला चष्माही निशाणी मिळालेली आहे विशेष म्हणजे ही निवडणूक देखील त्या काळासारखेच होईल आणि खोक्यावाल्यांना त्यांची वाट दाखवल्याशिवाय राहणार नाही.
पारोळा शहराला पाणीपुरवठा करणारे धरण म्हणजेच तामसवाडी धरण ही देण भास्करराव पाटलांचीच आहे हे जनता जाणून आहे म्हणून खोक्या वाल्यांच्या दहशतवादाला बळी पडणार नाही असे चित्र पारोळ्यात आहे. माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण बाळासाहेब पाटील यांनी देखील पाच वर्षात विकासात्मक कामे केल्यामुळे पारोळा शहराला वेगळे वैभव प्राप्त झाले प्राप्त झाले.
तीन वर्षापासून पारोळा शहरात प्रशासक असल्यामुळे सत्ताधाऱ्यांची पकड निर्माण न झाल्यामुळे शहराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे असे चित्र पारोळा शहरातील सध्या तीन वर्षापासून झालेले आहे पुन्हा पारोळा शहराची गाडी रुळावर आणण्यासाठी चष्मा या निशाणीची सुनामी लाट येणार अशी चर्चा पारोळा शहरात आहे.


