Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » १३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर !
    जळगाव

    १३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर !

    editor deskBy editor deskNovember 6, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश

    जळगाव : प्रतिनिधी
    जळगाव जिल्ह्यातील १३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना अखेर दीड वर्षानंतर आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर झाला असून, जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने अत्यंत किचकट आणि तांत्रिक प्रक्रियेवर मात करून हे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.

    मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि प्रभावी समन्वयामुळे अनेक महिने प्रलंबित असलेला हा विषय मार्गी लागला आहे. संबंधित प्रस्तावांची तपासणी, पडताळणी आणि मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करून पात्र अधिकाऱ्यांना लाभ वितरीत करण्यात आला आहे.

    या कामी प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अजय चौधरी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी पी. आर. चौधरी तसेच ग्रामपंचायत विभागातील सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या काटेकोर नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना त्यांच्या पात्र हक्काचा लाभ अखेर मिळाला आहे.

    मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी सांगितले की, “अधिकाऱ्यांच्या सेवाभावी वृत्तीचा आणि प्रामाणिकपणाचा सन्मान म्हणून शासनाच्या सर्व योजना वेळेत व अचूक पद्धतीने अमलात आणणे हे आमचे ध्येय आहे. आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळाल्याने अधिकाऱ्यांचा उत्साह आणि प्रेरणा निश्चितच वाढेल.”

    या निर्णयामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांनी जिल्हा प्रशासनाचे विशेष आभार मानले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.