Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वाघाच्या हल्ल्यात म्हैस ठार : यावल तालुक्यात खळबळ !
    Uncategorized

    वाघाच्या हल्ल्यात म्हैस ठार : यावल तालुक्यात खळबळ !

    editor deskBy editor deskJuly 16, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी

    तालुक्यातील पाडळसे आणि भोरटेक परिसरात वाघाचे वास्तव्य असल्याच्या चर्चाना आता पुष्टी मिळत आहे. मंगळवारी पहाटे भोरटेक गावाजवळ शेतकरी भास्कर रमेश कोळी यांच्या गुरांच्या गोठ्यावर हल्ला करून एका म्हशीला ठार केले. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

    गेल्या काही दिवसांपासून या भागात वाघाच्या अस्तित्वाची चर्चा होती. वनविभागाच्या मते हा बिबट्या असावा, असे म्हटले होते तर काही ग्रामस्थांनी वाघाला प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा केला होता. या घटनेनंतर पाडळसे येथील पोलिस पाटील, सुरेश खैरनार यांनी वन विभागाला माहिती दिली.

    यावल पूर्वचे वनक्षेत्रपाल एस. एम. पटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरकठोरा वनपाल आय. एस. तडवी, फैजपूर वनपाल अतुल तायडे, गस्तीपथक वनपाल आर. एम. जाधव, वनरक्षक गणेश चौधरी, वनरक्षक आय. बी. चव्हाण, वाहन चालक वाय. डी. तेली यांनी घटनास्थळी धाव घेतली.  वनविभागाने पावलांचे ठसे आणि इतर पुरावे गोळा केले असून, ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आणि रात्रीच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    तापी नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; भुसावळ शहरात शोककळा

    June 14, 2026

    उत्पन्न वाढवण्याच्या संधी उपलब्ध होतील, ज्यामुळे भविष्याबाबतचा तुमचा आत्मविश्वास वाढेल.

    June 12, 2026

    अखंड काँग्रेसची संकल्पना पुढे आणा; शरद पवारांनी पुढाकार घ्यावा – संजय राऊतांचे आवाहन

    June 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.