Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !
    क्राईम

    पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

    editor deskBy editor deskJune 27, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा : प्रतिनिधी

    मामलदे शिवारातील चोपडा- चुंचाळे रोडवर बुधवारी रात्री दरोड्याच्या तयारीत असलेल्या पुणे येथील सहा अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, शहर पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पोलिसांनी पथक तयार केले होते. बुधवारी रात्री मामलदे शिवारातील चोपडा-चुंचाळे रोडवर अंधारात निर्जनस्थळी उभी असलेली कार शिताफीने शोधून काढली. या कारमध्ये सहाजण दडून बसले होते. त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता लोखंडी टॉमी, मिरचीपूड, दोर असे घरफोडी करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य मिळून आले. चारचाकी वाहन, मोबाईल असा मिळून एकूण १० लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल यावेळी पोलिसांनी जप्त करून आरोपींना अटक केली आहे.

    यातील तीन आरोपी हे अल्पवयीन आहेत. त्यांना बालसुधारगृहात रवाना करण्यात आले असून तुषार उर्फ तुषल्या गौतम झेंडे (२५, निगडी, पुणे), विनोद राकेश पवार (२५, चिंचवड), सुनील गोरख जाधव (३०, चिंचवड) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर पुण्यात खून, दंगल, दरोडे, खंडणी, असे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस पथकात सपोनि एकनाथ भिसे, दीपक विसावे, संतोष पारधी, जितेंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर जवागे यांचा सहभाग होता. आरोपींना न्यायालयात उभे केले असता त्यांना २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.