Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘या’ नावाने केले खडसे व राऊत यांचे फोन टॅपींग
    राजकारण

    ‘या’ नावाने केले खडसे व राऊत यांचे फोन टॅपींग

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रApril 22, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून फोन टॅपींग प्रकरण सुरू आहे. दरम्यान याच प्रकरणातील चौकशीत अजून एक मोठा गौप्यस्फोट समोर आला असून खा. संजय राऊत आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे याची टोपण नावे वापरण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

    देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना राज्यातील काही राजकारण्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचे प्रकरण आता गंभीर वळणावर गेल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणात आधीच कुलाबा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला असून यात तत्कालीन पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांचाही समावेश आहे.

    या प्रकरणात आतापर्यंत संजय राऊत आणि एकनाथराव खडसे यांनी आपले जबाब नोंदविले असून सोबत सहा साक्षीदारांचेही जबाब घेण्यात आले आहेत. या प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीतून आता नवीन धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. या प्रकरणात सहभागी असणार्‍या इतर पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार राऊत आणि खडसे यांच्या फोन टॅपींगचे निर्देश देतांना त्यांच्याच नावाचे साधर्म्य असणारी पण बनावट नावे वापरण्यात आल्याची माहिती या पोलिस अधिकार्‍यांनी दिली आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    वाढदिवसाचा अनोखा आदर्श! नगरसेवक इंजि. नरेंद्र पाटील यांनी गरजूंना रेनकोट वाटून दिला सामाजिक संदेश

    July 30, 2026

    विद्यार्थी-शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी भाजपला रामराम! अमळनेरचे श्याम पाटील यांचा सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

    July 26, 2026

    चाळीसगावच्या निर्णयविरोधात
    किशोर आप्पांचा एल्गार!

    July 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.