Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव वाहनाच्या जबर धडकेत रिक्षातील दोन्ही भाऊ जागीच ठार !
    क्राईम

    भरधाव वाहनाच्या जबर धडकेत रिक्षातील दोन्ही भाऊ जागीच ठार !

    editor deskBy editor deskJune 4, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    निमखेडी शिवारात आज दि.४ रोजी पहाटेच्या सुमारास एका भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. मृतांची नावे ज्ञानेश्वर झगडू शिवदे आणि प्रमोद दगडू शिवदे अशी आहेत.

    सविस्तर वृत्त असे कि, दुध फेडरेशन ते निमखेडी रस्त्यावरील जुना हायवे येथे कांताई नेत्रालयाजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. मयत ज्ञानेश्वर शिवदे हे शिवसेना (शिंदे गट) महिला शहरप्रमुख ज्योती शिवदे यांचे पती होते, तर प्रमोद हे त्यांच्या पतीचे बंधू होते. एकाच अपघातात दोन्ही भावांचा मृत्यू झाल्याने शिवदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    ज्ञानेश्वर आणि प्रमोद हे दोघेही पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करत होते. दररोजप्रमाणे पाणीपुरीचा माल तयार करण्यासाठी ते शिवाजीनगर येथील जुन्या घरी जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला. अपघातानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी नातेवाईकांसह शिवसेना शिंदे गटाचे अनेक कार्यकर्ते रुग्णालयात उपस्थित होते. दरम्यान, अपघातानंतर अज्ञात वाहनचालक फरार झाला असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. या दुर्घटनेमुळे जळगाव शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.