Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » यावल तालुक्यात बिबट्याने केला बकरीवर हल्ला : शेतकरी थोडक्यात बचावला !
    क्राईम

    यावल तालुक्यात बिबट्याने केला बकरीवर हल्ला : शेतकरी थोडक्यात बचावला !

    editor deskBy editor deskApril 28, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी

    तालुक्यातील डोंगरकठोरा शेत शिवारात डोंगरदे वस्तीच्या मागील शेतात केळीच्या पिकास पाणी भरण्यास गेलेल्या शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केला मात्र, प्रसंगवधान राखत शेतकऱ्यांने बिबट्याच्या तोंडावर माती फेकली व जोर जोरात आरडा ओरड केल्याने बिबट्या तेथुन पळाला, तर या बिबटयांने एक बकरी फस्त केलेली दिसुन आली आहे. बिबट्‌या सह एक त्याचे पिल्लू देखील सोबत असल्याने शेतकऱ्याने सांगीतले आहे. या घटनेनंतर डोंगरकठोरा परिसरात भिती पसरली असुन वनविभागास माहिती देण्यात आली आहे. वन विभागाकडून या शेत शिवारात विविध ठिकाणी कर्मचाऱ्यांची गस्त सह टूप कॅमेरे लावण्यात आले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, डोंगरकठोरा ता. यावल येथील शेतकरी मनोहर बळीराम पाटील हे गुरूवारी नेहमीप्रमाणे आपल्या केळीच्या बागेला पाणी भरत होते. त्यांना बिबट्याने एका बकरीची शिकार केल्याचे  दिसले. बकरी फस्त केलेल्या बिबटयाला पाहुन पाटील लगबगीने केळी बागातुन बाहेर पळू लागले असता बिबट्‌याचे एक लहान पिल्लूला ते धडकले व जमीनीवर कोसळले. यात आवाज झाल्याने बिबट्याने त्यांच्या दिशेने येत त्यांच्यावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला असता पाटील यांनी प्रसंगवधान राखत बिबटयाच्या तोंडावर माती फेकली आणी जोर जोरात आरडा ओरड केली तेव्हा बिबट्या तेथुन पळून गेला. सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. वनक्षेत्रपाल स्वनिल फटांगरे यांनी या भागात जावुन पाहणी केली तसेच कर्मचाऱ्यांच्या वतीने या भागात ट्रॅप कॅमेरे विविध भागात लावण्यात आले आहे. तर या भागात बिबट व त्याच्या पिल्लांचा वार असल्याचे उघड झाल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये भिती पसरली आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी बिबट्याला तात्काळ पकडून सुरक्षित ठिकाणी हलविण्याची मागणी केली आहे. डोंगरदे या पाड्या जवळ मेंढपाळ ठाकूर पावरा यांचे बकऱ्यांचे कळप आहे. तेथुन बिबट्याने बकरी पळवली होती व तिची शिकार केल्यानंतर केळीच्या बागात बिबट्या होता

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.