Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » संरक्षण मंत्र्यांनी दिला थेट पाकिस्तानला इशारा !
    क्राईम

    संरक्षण मंत्र्यांनी दिला थेट पाकिस्तानला इशारा !

    editor deskBy editor deskApril 23, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली ; वृत्तसंस्था

    देशातील जम्मू काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे, पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगाम येथे पर्यटकांना त्यांचं नाव विचारून त्यांच्यावर गोळीबार केला. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट आहे.  यावर प्रतिक्रिया देताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आता पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे.

    दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल, भारत अशा हल्ल्याला घाबरणार नाही. दहशतवाद्यांना असं उत्तर मिळेल की संपूर्ण जग बघेल, दहशतवादाला रोखण्यासाठी भारताची झिरो टॅलरन्स पॉलिसी आहे, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे, याचबरोबर पडद्यामागे कारस्थान रचनाऱ्यांनाही शिक्षा मिळणार, असा थेट इशारा राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला आहे.

    जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये दहशतवादी हल्ला झाला, पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या भ्याड हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये  महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट असून, राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. पडद्यामागे कारस्थान रचनाऱ्यांनाही शिक्षा मिळेल,  दहशतवाद्यांना असं उत्तर मिळेल की संपूर्ण जग बघेल, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

    दरम्यान जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. देशभरातील प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. मुंबई, दिल्ली, पुण्यासह कोकण किनारपट्टीवर विशेष सतर्कता जारी करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमध्ये या घटनेचा निषेध करत बंदची हाक देण्यात आली, जम्मू काश्मीरच्या अनेक भागांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला असून, अनंतनागमध्ये संचारबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन करून हल्ल्याबाबत माहिती घेतली आहे. आम्ही अशा कठीण परिस्थितीमध्ये सरकारसोबत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.