Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बोहल्यावर चढण्यापूर्वीच कारच्या धडकेत तरुण ठार !
    क्राईम

    बोहल्यावर चढण्यापूर्वीच कारच्या धडकेत तरुण ठार !

    editor deskBy editor deskApril 19, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नांदेड : वृत्तसंस्था

    वसमत तालुक्यातील नांदेड रस्त्यावरील गिरगाव पाटीजवळील विशाल धाब्यासमोर कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवारी (दि.१९) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. विशाल गजानन गवळी (वय २५, रा. सिंदगी ता. कळमनुरी) असे मृत तरूणाचे नाव आहे. त्याचे ३० एप्रिलरोजी लग्न होते. त्याच्या अपघाती निधनावर हळहळ व्यक्त होत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथील विशाल गवळी दुचाकीवरून (एमएच 38 ए.एच.8017) नांदेडहून वसमतकडे येत होता. तर वसमतहून कार (एमएच 22 बी.सी. 4374) नांदेडकडे जात होती. यावेळी कारने दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत विशाल जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. विशाल गवळी याचे 30 एप्रिलरोजी लग्न होते. परंतू, लग्नापूर्वीच त्याच्यावर काळाने घाला घातला. त्याच्या पश्‍चात एक भाऊ, आई, वडील असा परिवार आहे. या घटनेने सिंदगी गावावर शोककळा पसरली आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.