Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आधी मुलीशी नंतर आईचा केला नराधमाने अत्याचार !
    क्राईम

    आधी मुलीशी नंतर आईचा केला नराधमाने अत्याचार !

    editor deskBy editor deskApril 15, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कल्याण : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरात अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना आता कल्याणमध्ये एक संतापजनक प्रकार उजेडात आला आहे. एका 40 वर्षीय बदमाशाने आधी पित्याविना पोरक्या झालेल्या मुलीशी अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखून मुलीने बदमाशाच्या तडाख्यातून कशीबशी सुटका करवून घेतली नाही तोच आईवर देखिल या बदमाशाने अतिप्रसंगाचा प्रयत्न केला.

    तीन महिन्यांपूर्वी घडलेला हा सारा प्रकार महात्मा फुले चौक पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने तक्रार केली होती. पोलिसांनी चौकशी करून याप्रकरणी संबंधित इसमाच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार कायद्यासह भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुरूवारी गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात आपल्या मुलीच्या संदर्भात अघटीत घडले. मुलगी संध्याकाळी घरी आली त्यावेळी ती अतिशय अस्वस्थ होती. तिच्या शरीराला दुर्गंधी येत होती. विचारपूस केली असता आपल्या ओळखीच्या काकाने मला आपले वडिल राहत असलेल्या घरी नेले. तेथे आपल्याशी अश्लिल चाळे केल्याचे मुलीने सांगितले. हे ऐकून तक्रारदार महिलेला हादरा बसला.

    मुलीशी गैरकृत्य करणारा इसम रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तक्रारदार महिलेच्या घरात घुसला. तुझा नवरा मयत झाला आहे. तुम्ही येथे आता राहू नका. इमारती खाली एक गाडी उभी आहे. त्यात बसा आणि निघून जा, असा बोलला. आम्ही घर सोडून कुठेही जाणार नाही, असे सांगताच त्याने गळ्यातील ओढणी ओढली. या इसमापासून बचाव करण्यासाठी महिला बेडरूममध्ये निघून गेली. हा इसम महिलेच्या पाठीमागे आला. त्याने धक्का मारून महिलेला बिछान्यावर पाडून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

    या घटनेची त्या बदमाशाने त्याच्या मोबाईलद्वारे व्हिडियो तयार करण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्याला जोरदार प्रतिकार करून धक्का देत त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आडदांड बदमाशाने महिलेला धमक्या देत शिवीगाळ केली. घरातून बाहेर जात नसल्याने महिलेने ओरडाओरडा करत त्या बदमाशाला धक्के मारत घराबाहेर काढून दरवाजा आतून बंद करून घेतला. घडल्या प्रकाराने पिडीत महिला प्रचंड अस्वस्थ झाली होती.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.