Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मेहुण्याने केले चाकूने वार, शालकाचा उपचारादरम्यान झाला मृत्यू !
    क्राईम

    मेहुण्याने केले चाकूने वार, शालकाचा उपचारादरम्यान झाला मृत्यू !

    editor deskBy editor deskApril 15, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शेत जमिनीला वारस लावण्यावरून वाद होऊन चाकू हल्ल्यातील जखमी तौफिक कय्यूम पिंजारी (वय ३२, रा. सदाशिव नगर, मेहरुण) यांचा उपचार सुरू असताना सोमवारी (दि. १४) मृत्यू झाला. तौफिक यांच्यावर ११ एप्रिल रोजी वार करण्यात आल्यानंतर त्यांच्या दोन्ही मेहुण्यांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

    मिळालेल्या माहितीनुसार, तौफिक पिंजारी व त्यांचे मेहुणे अस्लम समशोद्दीन पिंजारी व शफिक गफूर पिंजारी यांच्यामध्ये शेत जमिनीला वारस लावण्यावरून वाद झाले होते. ११ एप्रिल रोजी तौफिक यांच्या घरी जाऊन त्यांना दोन्ही मेहुण्यांनी मारहाण केली. अस्लम याने तरुणाच्या कमरेजवळ चाकूने वार केला होता. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पिंजारी यांच्या मृत्यूप्रकरणी आता खुनाचे कलम वाढले आहे. या प्रकरणात शफिक गफूर पिंजारी याला नशिराबाद ते जळगाव दरम्यान पोउनि राहुल तायडे, पोहेकों नितीन ठाकूर, नाना तायडे, गणेश ठाकरे, राहुल घेटे यांनी अटक केली. तर अस्लम समशोद्दीन पिंजारी हा न्यायालयात हजर झाला. तपास पोउनि अशोक काळे करीत आहेत.

    ११ एप्रिलपासून तौफिक यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. १३ एप्रिल रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दुसऱ्या खासगी रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार त्यांना तेथे नेले, मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्याचे सांगण्यात आले. याठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा १४ एप्रिल रोजी पहाटे मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026

    अमळनेरातील डॉक्टराची एक कोटीत फसवणूक !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.