Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शुल्लक कारणाने दोघांना जबर मारहाण !
    क्राईम

    शुल्लक कारणाने दोघांना जबर मारहाण !

    editor deskBy editor deskApril 14, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी

    तालुक्यातील चिंचोली या गावात हळदीच्या कार्यक्रमात गाणे लावण्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून वढोदा सरपंच व त्यांचे भाऊ या दोघांना दोघांनी जबर मारहाण केली. व त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि रोख रक्कम देखील लांबवली. या मारहाणीत दोघे जण गंभीर जखमी झाले असून दोघांवर जळगावात उपचार सुरू असुन याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील चिंचोली या गावात एका हळदीच्या कार्यक्रमात गाणे लावण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून राहुल शरद कोळी व अरुण सुखराम कोळी या दोघांनी वढोदा गावाचे सरपंच संदीप प्रभाकर सोनवणे व त्यांचे बंधू डॉ. रविराज प्रभाकर सोनवणे या दोघांना जबर मारहाण केली व संदीप सोनवणे यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन लांबवली व डॉ. रविराज सोनवणे यांच्या खिशातून दहा हजाराची रोकड देखील लांबवली. या मारहाणी मध्ये दोघे सोनवणे बंधू हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवर जळगाव शहरात खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असुन या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात कैलास कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाक र यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार वसंतराव बेलदार करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.