Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पोलीस विभागात खळबळ : दोन हवालदारांनी स्वीकारली २० हजारांची लाच !
    क्राईम

    पोलीस विभागात खळबळ : दोन हवालदारांनी स्वीकारली २० हजारांची लाच !

    editor deskBy editor deskApril 12, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शासकीय कार्यालयात कामे करण्यासाठी अधिकारी व कर्मचारीकडून लाच घेण्याचे प्रमाण वाढत असतांना आता एसीबीने जळगाव शहर पोलीस स्थानकात सापळा लावत दोन पोलीस हवालदार यांना ताब्यात घेतल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलिस अंमलदाराने २० हजाराच्या लाचेची मागणी केली होती. तो कर्मचारी ठाणे अंमलदाराच्या ड्युटीवर असतांना त्याला २० हजाराची लाच स्विकारताना लाच लुचपत विभागाने ही कारवाई केली आहे. शहर पोलिस ठाण्यात झालेल्या या कारवाईने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहर पोलिसात दाखल असलेल्या गुन्हयात तक्रारदाराला मदत करण्यासाठी पोलिस अंमलदाराने २० हजाराच्या लाचेची मागणी केली होती. परंतु तक्रारदाराला लाच दयायची नसल्याने त्याने लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली. तक्रारदाराच्या तक्रारीची पडताळणी करून एसीबीच्या पथकाने सापळा रचला होता. रात्री आठ वाजेच्या सुमारास ड्युटी बदलल्यानंतर ड्युटीवर ठाणे अंमलदार हजर झाला. त्यानंतर तक्रारदाराकडून अंमलदाराला २० हजाराची लाच स्विकारली. तक्रारदाराने इशारा केल्यानंतर सापळा रचलेल्या एसीबीच्या पथकाने त्या पोलिसाला लाचेची रक्कम घेतांना रंगेहाथ पकडले. या कारवाई  पोलीस हवालदार रविंद्र प्रभाकर सोनार व धनराज निकुभ यांना अटक करण्यात आली आहे. पथकाने लाचखोर अंमलदारासह एका पोलिस कर्मचाऱ्याला चौकशीसाठी घेवून गेले असुन रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

    लाच लुचपत विभागाचे पोलिस उप अधिक्षक योगेश ठाकूर, पोलिस निरीक्षक श्रीमती स्मिता नवघरे, पोउपनिरी सुरेश पाटील चालक पोहेकॉ रविंद्र घुगे पोहेकॉ जनार्दन चौधरी चालक  पोहेकॉ सुनिल वानखेडे पोना/ बाळू मराठे, पो. कॉ/राकेश दुसाने यांनी हि कारवाई यशस्वी केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026

    अमळनेरातील डॉक्टराची एक कोटीत फसवणूक !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.