Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बनावट स्वाक्षरीचे नमुने छत्रपती संभाजीनगरात पाठवणार !
    क्राईम

    बनावट स्वाक्षरीचे नमुने छत्रपती संभाजीनगरात पाठवणार !

    editor deskBy editor deskApril 10, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    तहसीलदारांची बनावट स्वाक्षरी करुन बोगस आदेश तयार करणारा मुख्य सूत्रधार अॅड. शेख मोहम्मद रईस मोहम्मद इद्रिस बागवान व अॅड. शेख मोहसीन शेख सादीक मन्यार या दोघांना अटक करण्यात आली आहे. आदेशावर तहसीलदारांची बनावट स्वाक्षरी करणाऱ्या अॅड. शेख मो. रईस बागवान यांच्या अक्षरासह त्याच्या स्वाक्षरीचे नमुने घेण्यात आले आहे. ते नमुने छत्रपती संभाजीनगर येथील वादग्रस्त दस्ताऐवज पडताळणी विभागात पाठविण्यात येणार आहे.

    जन्म दाखल्यांसाठी तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीने बोगस आदेश प्रकरणाचा पर्दाफाश झाला असून याप्रकरणी ४३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

    या गुन्ह्याचा तपास करतांना सुरुवातीला प्रकरणे दाखल असलेल्या अर्जदार हे बांग्लादेशी आहेत की, भारतीय याची पडताळणीसाठी त्यांची भारतीयत्व असल्याची कागदपत्रे सादर करण्यात आली होती. त्यानंतर आता पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास वेगवेगळ्या दिशेने केला जात आहे. दरम्यान, तहसीलदारांचे बनावट आदेश तयार करुन त्यावर त्यांचा शिक्का मारणारा मुख्य संशयित अॅड. शेख मो. रईस बागवान याच्यासह त्याचा साथीदार एजंट अॅड. शेख मोहसीन मन्यार या दोघांना अटक करण्यात आली होती

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जामनेर : १६ वर्षीय मुलीचा विनयभंग : एका विरोधात गुन्हा दाखल !

    April 21, 2026

    चोपड्यात थरारक खून प्रकरणाचा २४ तासांत छडा : संशयित आरोपी अटकेत !

    April 21, 2026

    लातूर हादरला : आईसह दोन निष्पाप जीवांचा दुर्दैवी अंत !

    April 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.