Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आ.पडळकरांचा रोहित पवारांवर गंभीर आरोप !
    क्राईम

    आ.पडळकरांचा रोहित पवारांवर गंभीर आरोप !

    editor deskBy editor deskMarch 26, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोपाची फैरी सुरु असणा आता भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी खळबळजनक आरोप आ.रोहित पवार यांच्यावर केला आहे.

    आ.गोपीचंद पडळकर म्हणाले कि, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्यावर हल्ला घडवून आणल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार तथा धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. त्यांनी यासंबंधी पुरावा म्हणून एका व्यक्तीलाही हजर केले. त्याच्या छातीवर शरद पवारांचा फोटो गोंदलेला होता. पडळकर यांच्या या आरोपामुळे राजकारण चांगलेच पेटले आहे. गोपीचंद पडळकर बुधवारी विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आमदार रोहित पवार यांनी 2021 मध्ये माझ्यावर हल्ला घडवून आणला. वर्षभरापूर्वी एक व्यक्ती माझ्याकडे आला. त्याने मला सांगितले की, रोहित पवार व सुप्रिया सुळे तुमच्याविरोधात षडयंत्र रचत आहेत. मला धनगरांचा विरोध आहे हे दाखवण्यासाठी धनगर तरुणांना फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची फेरचौकशी करावी. तसेच संबंधितांना सहआरोपी करावे.

    विरोधक माझ्या जवळच्या तरुणांना माझ्यावर हल्ला करण्यासाठी फितवण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः रोहित पवार हे पडळकरांना मारहाण करा, त्यांचे व्हिडिओ सादर करा, त्यांच्याविरोधात पोस्ट करा, धनगर समाजाच्या कार्यक्रमात गोंधळ घाला असे सांगत आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रोहित पवारांविषयीचा माहिती पुढे आणली. ते आपल्या आजोबाचा विषय पुढे चालवत आहेत. जयकुमार गोरे प्रकरणात त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. याशिवाय सोलापुरात माझ्या गाडीवर जो हल्ला झाला होता, त्या प्रकरणी या व्यक्तीचे स्टेटमेंट घेत रोहित पवारांवर गुन्हा दाखल करावा, असे ते म्हणाले.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.