Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुचाकीचा अपघातात तरुण कारागिराचा दुर्देवी मृत्यू !
    क्राईम

    दुचाकीचा अपघातात तरुण कारागिराचा दुर्देवी मृत्यू !

    editor deskBy editor deskMarch 23, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा : प्रतिनिधी

    शहरातील मोंढाळा रोडवर झालेल्या अपघातात २६ वर्षीय बांधकाम कारागिराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २२ रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली आहे. तर हा अपघात नसुन घातपात झाल्याचा संशय मयताचा भाऊ याने व्यक्त केला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील बहिरम नगर येथील रहिवासी हर्षल बाबुलाल तडवी (वय – २६ वर्ष) या तरुणाचा मोंढाळे रोडवर २२ मार्च रोजी सायंकाळी ७:३० वाजता मोटरसायकल अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हर्षल तडवी हा सायंकाळी मित्रास घरी सोडुन आपल्या घराकडे परतत असताना हर्षल यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळुन आला.

    हर्षल यांचे डोक्यास गंभीर स्वरूपाचा मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हर्षल तडवी यांचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येवुन पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अपघात घडुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुनिल निकम हे करीत आहे. मयत हर्षल तडवी यांचे पाश्चात्य वृद्ध आई, वडिल, पत्नी, एक भाऊ असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मविआत राज्यसभा–विधान परिषद जागांवरून जागांवरून तणाव शिगेला; ठाकरे–काँग्रेसमध्ये रस्सीखेच

    February 20, 2026

    “मी दादागिरी करणारच” वक्तव्याने पेटला वाद; सपोनि चौधरी नियंत्रण कक्षात

    February 20, 2026

    चौघांनी केली तरुणावर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने मारहाण !

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.