Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » हॉटेलात राडा : चौघांनी केली चालकाला जबर मारहाण !
    क्राईम

    हॉटेलात राडा : चौघांनी केली चालकाला जबर मारहाण !

    editor deskBy editor deskMarch 18, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील गेंदालाल मिल परिसरात रविवार दि. १६ मार्च रोजी दारू पिऊन आलेल्यांना हॉटेलमध्ये आरडाओरड करण्यास मज्जाव केल्याचा राग आल्याने हॉटेल चालक शेख शाहरुख शेख गणी (२९, रा. गेंदालाल मिल परिसर) यांना चार जणांनी मारहाण केली.

    सविस्तर वृत्त असे कि, शेख यांच्या हॉटेलमध्ये आदेश, सोन्या, आवेश (पूर्ण नाव समजू शकले नाही) आणि त्यांचा एक साथीदार असे चार जण आले होते. दारूच्या नशेत चौघेही आपसात मस्करीने एकमेकांना शिवीगाळ करीत आरडाओरड करीत होते. त्यावेळी शेख यांच्या आईने त्यांना शांततेत जेवण करण्याविषयी सांगितले, तरीही ते ऐकत नसल्याने शेख त्यांना समजावण्यासाठी गेले असता, त्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीवरून वरील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.