Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव बसची कंटेनरला जबर धडक : ९ प्रवासी जखमी !
    क्राईम

    भरधाव बसची कंटेनरला जबर धडक : ९ प्रवासी जखमी !

    editor deskBy editor deskMarch 16, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा : प्रतिनिधी

    सुरतहून बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या बसने पुढे चालणाऱ्या कंटेनरला मागून धडक दिल्याने नऊ जण जखमी झाले. यात लहान मुले, वृद्ध, महिला यांचा समावेश आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अडावद-यावल मार्गावर लोणी शिवारातील मोहन नाल्याजवळ शनिवारी दुपारी ४ वाजता ही घटना घडली.

    मध्यप्रदेश परिवहन मंडळाची मान्यता असलेली (एमपी- ६८, पी-२७०) या प्रवासी वाहतूक करणाऱ्या सुरत-ब-हाणपूर बसने अडावदनजीक लोणी शिवारातील मोहन नाल्याच्या पुलाजवळ दुचाकीस्वाराला वाचविताना पुढे चालणाऱ्या कंटेनरला मागून धडक दिली.

    यावेळी लोणी पोलिस पाटील नरेंद्र पाटील यांनी रुग्णवाहिका बोलवून ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेत बसविले. जखमींवर धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, आरोग्य सेविका भारती सोनवणे, भिकूबाई बोदडे, निशा वळवी, मोनाली पाटील, शिपाई विलास पवार, प्रशिक्षणार्थी निखिल सोनवणे यांनी प्रथमोपचार करून जिल्हा रुग्णालयात पाठवले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.  घटनास्थळी अडावद पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद बाघ, पोकॉ. सुनील तायडे, फिरोज तडवी, अनिल पिसाळ, शेषराव तोरे, शुभम बाविस्कर यांनी दोन्ही बाजूंनी खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. तसेच लक्ष्मण गुरव अडावद, धीरेंद्र पाटील, शैलेश पाटील, सौरव पाटील पंचक या तरुणांनी मदत केली.

    नबाब रुबाब खाटिक (५०, यावल), गोकुळ प्रताप पाटील (३८, चोपडा), निर्मला एकनाथ चौधरी (४५), उज्ज्वला नीलेश पाटील (३८, दोन्ही रा. धानोरा), राजाराम भागा चव्हाण (६५), मंगला शंकर डोळे (५०, दोन्ही रा. धुळे), भावेश शरद भामरे (१२), आशा प्रदीप भामरे (३५, दोन्ही रा. मेहरगाव) आणि रामचंद्र बळीराम सोनवणे (५०, हिंगोणा) हे जखमी झाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.