Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नववधू लग्नाच्या तिसऱ्या दिवशी दागिने घेवून फरार !
    क्राईम

    नववधू लग्नाच्या तिसऱ्या दिवशी दागिने घेवून फरार !

    editor deskBy editor deskMarch 16, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    एजंटच्या मध्यस्थीने एक लाख ६० हजार रुपये देऊन मुलाचे लग्न केले, मात्र लग्नाच्या तिसऱ्या दिवशी वधू दागिन्यांसह रात्रीतून पसार झाली. यामध्ये वराकडील मंडळींची दोन लाख ४४ हजार रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. हा प्रकार १४ ते २३ फेब्रुवारी दरम्यान घडला.

    याप्रकरणी १३ मार्च रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात वधूसह एजंट व इतर दोघे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामेश्वर कॉलनी परिसरात २७ वर्षीय रिक्षाचालक तरुण आई, वडील, आजीसह राहतो. त्याच्या आईने बऱ्हाणपूर येथील आशाबाई (पूर्ण नाव समजू शकले नाही) नावाच्या एजंट महिलेशी संपर्क साधला. तिने पूजा गंगाराम गावडे (रा. पिपरी महेपाल, समरडक, ता.जि. यवतमाळ) ही लग्नाची मुलगी असून तिचा फोटो पाठविला. लग्नाची बोलणी पक्की झाली व एजंट महिलेला एक लाख ६० हजार रुपये देण्याचा व्यवहार ठरला. १९ फेब्रुवारीला पूजाचे रामेश्वर कॉलनीतील तरुणाशी लग्न लावून दिले. त्यानंतर एक लाख ६० हजार रुपये घेऊन वधू वगळता इतर जण निघून गेले. दि. २२ फेब्रुवारी रोजी, पूजा घरातून निघून गेल्याचे तरुणाच्या लक्षात आले. शोध घेऊनही पूजा सापडली नाही.

    तरुणाच्या आईने मणी-मंगळसूत्र, कर्णफुले, सोनपोत आदी दागिने लग्नामध्ये वधूला घातले होते. मात्र ८४ हजार रुपयांचे दागिने घेऊन वधू पसार झाली. पत्नी परत येत नसल्याने व पैसे, दागिनेही गेल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तरुणाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. एजंट आशाबाई, पूजा गावडे, निर्मलाबाई डोंगरे, शिवशंकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउनि अशोक काळे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.