Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तीन चोरटे आले अन एटीएम मशीनची उचलून नेले : घटना सीसीटीव्हीमध्ये कैद !
    क्राईम

    तीन चोरटे आले अन एटीएम मशीनची उचलून नेले : घटना सीसीटीव्हीमध्ये कैद !

    editor deskBy editor deskMarch 6, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नागपूर : वृत्तसंस्था

    महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर मध्ये गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारी घटना घडत असतांना आता तर चोरट्यांनी धूमाकूळ घातला आहे. गुन्ह्यांच्या वाढत्या घटनामुळे नागरीक मात्र चांगलेच त्रस्त झाले आहेत. नागपूरमध्ये तीन चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनचीच चोरी करून ते उचकटून घेऊन गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. नागपूर जिल्ह्यातील उपरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत भानेगाव येथील घटना आहे. चोरीची ही अफलातून घटना सीसीटीव्ही मध्येदेखील चित्रीत झाली आहे. मात्र यामुळे मोठी दहशत माजली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला एटीएम सेंटर मधून चक्क एटीएम मशीन चोरून नेल्याची घटना बुधवारी भानेगाव येथे उघडकीस आली. ही घटना रात्री पावणे दोन वाजता घडली असल्याचे सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाले आहे. भानेगाव टी पॉइंट पासून पारशिवणी मार्गावर 200 मीटर अंतरावर निलेश राऊत यांचे घर आहे. घराच्या समोर अंगणात वकरंगी कंपनीचे एटीएम मशीन लागले होते.मंगळवारी रात्री दीड वाजता दरम्यान पारशिवनी मार्गाकडून पांढऱ्या रंगाची चारचाकी मालवाहू गाडी निलेश राऊत यांच्या घराजवळ येऊन थांबली. गाडीतून तीन व्यक्ती उतरले आणि एटीएम मशीन जवळ आले.

    त्यांनी एटीएम मशीन मध्ये आणि एटीएम मशीन रूम मध्ये लागलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यावर काळया रंगाच्या स्प्रे मारला. तर निलेश राऊत यांच्या घरी लागलेला कॅमेरा बंद करण्यासाठी चोरांनी वायर कापली. मात्र ती वायर बंद असलेल्या लाईटचा होता. चोरांना वाटले की कॅमेरा बंद झाला. तिन्ही चोरांनी एटीएम रूम मध्ये जाऊन एटीएम मशीन उचलून चार चाकी मालवाहू गाडीत लोड केली. त्या मालवाहू गाडीत आधीच एक गाडी चालक बसला होता. चौघेही त्या गाडीत बसून एटीएम मशीन पारशिवणीच्या दिशेने घेऊन गेले. हा सर्व चोरीचा प्रकार निलेश राऊत यांच्या घरी लागलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. बुधवारी पहाटे पाच वाजता मॉर्निंग वॉकिंगसाठी जात असताना त्यांना एटीएम मशीन दिसलं नाही. एटीएम मशीनची किंमत 2 लाख 10 हजार रुपये असून, एकूण 2 लाख 52 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला.त्यामुळे त्यांनी जागरूकतेने 112 वर कॉल केला आणि एटीएम मशीन चोरी झाल्याची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस शोध घेत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.