Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शिक्षण क्षेत्रात खळबळ : शाळेच्या मुख्याध्यापकानेच केले विद्यार्थिनीशी अश्लिल चाळे !
    क्राईम

    शिक्षण क्षेत्रात खळबळ : शाळेच्या मुख्याध्यापकानेच केले विद्यार्थिनीशी अश्लिल चाळे !

    editor deskBy editor deskMarch 6, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    गडचिरोली : वृत्तसंस्था

    गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचारासह विनयभंगाच्या घटना घडत असतांना आता गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलिस ठाण्यांतर्गत एका गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीशी मुख्याध्यापकानेच अश्लिल चाळे केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी रवींद्र उष्टूजी गव्हारे (वय ४६, रा. भामरागड) या मुख्याध्यापकास अटक केली आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

    संबंधित गाव आदिवासीबहुल असून, तेथे जिल्हा परिषदेची इयत्ता पाचवीपर्यंतची शाळा आहे. शाळेत पूर्वी रवींद्र गव्हारे आणि अन्य एक शिक्षक कार्यरत होते. परंतु दुसऱ्या शिक्षकास अन्य ठिकाणी प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत मुख्याध्यापक रवींद्र गव्हारे हा तेथे एकटाच कार्यरत होता.

    ५ मार्चला सकाळी शाळेची वेळ झाली. गावातील एका महिलेने तिची ९ वर्षीय मुलगी आणि तिच्याकडेच राहणाऱ्या नणंदेच्या ११ वर्षीय मुलीस शाळेत जाण्याच्या तयारीविषयी विचारणा केली. परंतु दोघींनीही शाळेत जाण्यास नकार दिला. दोघींनाही विश्वासात घेऊन कारण विचारले असता, मुख्याध्यापक रवींद्र गव्हारे हा आपल्या कार्यालयात रजिस्ट्रर आणण्याच्या बहाण्याने बोलावून अश्लिल कृत्य करायला लावतो. शिवाय कुणाला सांगितले तर जिवे मारेन, अशी धमकीही देत असल्याचे दोघींनी सांगितले. त्यानंतर संबंधित महिलेने शाळेतील अन्य दोन विद्यार्थिनींकडे विचारणा केली असता त्यांनीही मुख्याध्यापक गव्हारे याने आपणाशी असेच कृत्य केल्याचे सांगितले. मागील आठवडाभरापासून हा प्रकार सुरु होता.

    यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी लाहेरी उपपोलिस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी पीडित मुलगी व कुटुंबीयांचे बयाण नोंदवून आरोपी रवींद्र गव्हारे याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, एम.रमेश, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सचिन सरकटे पुढील तपास करीत आहेत.

    तीन दिवसांपूर्वीच गडचिरोली तालुक्यातील शिवणी येथे युवतीवर एका नराधमाने अतिप्रसंग केला होता. या घटनेची शाई वाळण्यापूर्वीच भामरागड तालुक्यात चक्क मुख्याध्यापकानेच अल्पवयीन मुलीशी अश्लिल चाळे केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.