Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मंत्री अडचणीत : महिलेला पाठविले स्वतःचे विवस्त्र फोटो !
    क्राईम

    मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मंत्री अडचणीत : महिलेला पाठविले स्वतःचे विवस्त्र फोटो !

    editor deskBy editor deskMarch 5, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील महायुती सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असणारे कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेला स्वतःचे विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप झाला आहे. या महिलेने या प्रकरणी योग्य ती कारवाई झाली नाही, तर 17 मार्चपासून विधान भवनासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच हल्लकल्लोळ माजला आहे.

    पीडित महिलेने यासंबंधी राज्यपालांसह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षांच्या नेत्यांना पत्र पाठवून मंत्री जयकुमार गोरे यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. आपल्या पत्रात पीडितेने हे संपूर्ण प्रकरण विषद केले आहे. त्यानुसार, सातारा जिह्यातील माण-खटाव मतदारसंघाचे जयकुमार गोरे हे आमदार आहेत. 2016 मध्ये आमदार असताना जयकुमार गोरे यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील वारस असलेल्या महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांनी अनेक महिने स्वतःचे नग्न फोटो महिलेला व्हॉट्सअॅपवर पाठवले होते. या त्रासाला कंटाळून महिलेने सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर जयकुमार गोरेंवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अटक टाळण्यासाठी गोरेंनी प्रथम सातारा जिल्हा न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. पण न्यायालयाने त्यांचा अटकूपर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर गोरे यांना अटक होऊन 10 दिवसांची जेलवारीही झाली होती.

    जयकुमार गोरे यांच्याकडून सोशल मीडियावर बदनामी सुरू आहे. याचा कुटुंबाला खूपच त्रास होत असल्याची तक्रार पीडितेने सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली होती. तेव्हा त्यांनी पोलिस अधीक्षक संपर्क साधतील, असे सांगितले. पण पुढे काहीच झाले नाही. मी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील आहे. काहीही दोष नसताना मला त्रास दिला जात आहे, असा आरोप पीडितेने आपल्या पत्रात केला आहे. या घटनाक्रमानंतर जयकुमार गोरे यांनी 2016 मध्ये सातारा जिल्हा न्यायालयात पीडित महिलेची लेखी माफी मागितली. तसेच पुन्हा त्रास देणार नाही, अशी वकिलांमार्फत हमीही दिली. पण आता महायुती सरकारमध्ये जयकुमार गोरे यांना ग्रामविकास मंत्रिपदाचे ‘बक्षीस’ देण्यात आले आणि त्यांनी महिलेला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. जानेवारी 2025 पासून अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपवर पीडितेने 2016 मध्ये दाखल केलेली तक्रार व्हायरल करण्यात आली. त्यामुळे पीडितेचे नाव उघड झाले. तिची बदनामी केली गेली. 9 जानेवारी 2025 रोजी पीडित महिलेच्या घरी पत्र आले. त्यात 2016ची तक्रार होती. हे पत्रही सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी सुरू आहे, असे पीडित महिलेने आपल्या पत्रात म्हटले आहे.

    जयकुमार गोरे यांनी आपले पीए अभिजित काळे यांच्यामार्फत माझ्याविरोधात दडिवाडी पोलिस ठाण्यात 2 कोटी खंडणीची तक्रार दाखल करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. या तक्रारीचे पुढे काय झाले हे माहीत नाही. मी खरी होते आणि आहे हेच यावरून सिद्ध होते, असेही पीडितेने म्हटले आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.