Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खडसेंच्या मुलीची छेड प्रकरण, अशा लोकांना माफी देता कामा नये : मुख्यमंत्री फडणवीस !
    क्राईम

    खडसेंच्या मुलीची छेड प्रकरण, अशा लोकांना माफी देता कामा नये : मुख्यमंत्री फडणवीस !

    editor deskBy editor deskMarch 2, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    देशाच्या केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आला. मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील जत्रेत सुरक्षारक्षक सोबत असताना रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढण्यात आली. तसेच व्हिडिओ देखील काढला होता. याप्रकरणी रक्षा खडके मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. यावेळी आक्रमक पवित्रा घेत त्यांनी आरोपींच्या अटकेच्या मागणी केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेमध्ये एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

    याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर एका आरोपीला ताब्यात घेतल्याने पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मात्र, या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका केंद्रीय मंत्र्यांची मुलगी सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य मुलींचे काय? असा प्रश्न या घटनेवरून उपस्थित होत आहे.

    यावर बोलताना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेमध्ये दुर्दैवाने एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी असल्याची सांगितले. या लोकांनी अतिशट वाईट प्रकारचे काम केलेले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल आहे. काहींना अटक केलेली आहे. इतरांनाही अटक केली जाईल. अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी छेडखानी करणे आणि त्रास देणे अतिशय चुकीचे आहे. कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना माफी देता कामा नये. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई होईल, असे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.