Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कीर्तन सुरु असतांना राडा : तरुणाला २० ते २५ जणांनी केली मारहाण !
    क्राईम

    कीर्तन सुरु असतांना राडा : तरुणाला २० ते २५ जणांनी केली मारहाण !

    editor deskBy editor deskFebruary 24, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    किर्तन सुरु असतांना त्याठिकाणी क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांकडून शिवीगाळ करीत गोंधळ घातला जात होता. त्यांना शिवीगाळ करु नका असे म्हटल्याचा राग आल्याने सुमारे वीस ते पंचवीस जणांच्या टोळक्याने बिजासन फकिरा घुगे (वय २९, रा. महादेव मंदिराजवळ मेहरुण) या तरुणाला मारहाण केली. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास मेहरुण परिसरातील महादेव मंदिरजवळ घडली. अचानक झालेल्या घटनेमुळे परिसरात पळापळ होवून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शहरातील

    सविस्तर वृत्त असे कि, मेहरुण परिसरातील महादेव मंदिराजवळ महाशिवरात्रीनिमित्त सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी किर्तन सुरु असतांना त्याच परिसरात काही तरुण क्रिकेट खेळत होते. क्रिकेट खेळतांना त्या तरुणांकडून गोंधळ घालून शिवीगाळ केली जात होती. दरम्यान, काही जणांनी त्या तरुणांना शिविगाळ करु नका असे म्हटले. त्याचा राग आल्याने सुमारे २० ते ३० जणांच्या टोळक्याने त्याठिकाणी येत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी त्या टोळक्याने बिजासन फकिरा घुगे या तरुणाला लाथा बुक्क्यांसह दगडाने मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.

    अचानक वाद झाल्यामुळे परिसरात पळापळ होवून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजितदादांच्या मृत्यूचे गूढ कायम; अधिवेशनात सरकारला जाब विचारण्याची मागणी

    February 23, 2026

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.