Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात व्यापाऱ्याला लुटणाऱ्या तिघांना केली पोलिसांनी अटक
    क्राईम

    जळगावात व्यापाऱ्याला लुटणाऱ्या तिघांना केली पोलिसांनी अटक

    editor deskBy editor deskFebruary 3, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव रेल्वेस्थानकावर उतरलेल्या व्यापाऱ्याला मारहाण करून जबरदस्तीने दुचाकीवर बसवून गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज येथे नेऊन मारहाण करत जबरी ऑनलाईन पद्धतीने २ हजार रुपये आणि खिशातील ३०० रुपये असे एकुण २ हजार ३०० रुपये घेऊन दमदाटी करून सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी १ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता घडली आहे याप्रकरणी शहर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तीन जणांना अटक केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शाहिद मुन्ना कुरेशी वय-३४, रा.उत्तर प्रदेश ह.मु. धुळे हे व्यापारी असून कर्नाटक एक्सप्रेसमधून जळगावला उतरले आणि जळगाव रेल्वे स्थानकाजवळील पान टपरीवर पान घेत होते. त्यावेळी दुचाकीवर तीन जण त्यांच्याजवळ आले, तू गायी कापायचा व्यवसाय करतो असे आरोप लावून तिघांन शाहिद कुरेशी याला मारहाण करून दुचाकीवर बळजबरी बसवून भुसावळ रोडवरील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ घेऊन गेले. त्या ठिकाणी सुरुवातीला २० हजार रुपयाची मागणी केली, इतके पैसे नसल्याने संशयित आरोपींनी ऑनलाईन पद्धतीने २ हजार रुपये घेतले आणि खिशातील ३०० रुपये जबरी काढून घेतले, अशी एकूण २ हजार ३०० घेऊन दमदाटी करून सोडून दिले. ही घटना घडल्यानंतर व्यापाऱ्याने जळगाव शहर पोलीस ठाण्यात दहा घेऊन तक्रार दिली, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्यासह त्यांच्या पथकाने तपासाची चक्री फिरविली. दरम्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे संशयित आरोपी यश रवींद्र पाटील वय-२१ रा. आव्हाने ता. जळगाव, मनोज आधार सोनवणे वय २३, रा.कांचन नगर, जळगाव आणि महेंद्र पांडुरंग पाटील वय-२८ रा. वाटिका आश्रम, जळगाव या तीन जणांना १० वाजेपर्यंत अटक केली आहे. या संदर्भात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्य पोलीस निरीक्षक रामचंद्र शिखरे हे करीत आहे.

    यांनी केली कारवाई
    पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र शिकारे, सहाय्यक फौजदार सुनिल पाटील, पोहेकॉ संतोष खवले, पोहेकॉ उमेश भांडारकर, सतिष पाटील, भास्कर ठाकरे, योगेश पाटील, किशोर निकुंभ,पोलीस नाईक चंदू सोनवणे, पो.कॉ. अमोल ठाकूर, पो.कॉ. पांचाळ, पो.कॉ. प्रणय पवार यांनी केली आहे. अटकेतील तिघांना आज जळगाव जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.