Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » डोक्यावर कर्जाचा बोजा : शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
    क्राईम

    डोक्यावर कर्जाचा बोजा : शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

    editor deskBy editor deskJanuary 30, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी

    तालुक्यातील पिळोदा खुर्द येथे कर्जामुळे हताश झालेल्या हिरालाल पंढरीनाथ सोनवणे (३७) शेतकऱ्याने या आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी येथे घडली.

    सविस्तर वृत्त असे कि, हिरालाल सोनवणे हे पिलोदा येथे आई, भाऊ, पत्नी, दोन मुलांसह राहात होते. शेती करून परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. यंदा त्यांनी शेतीसाठी बँकेकडून कर्ज घेतले होते. तसेच गावातदेखील काही जणांकडून उसनवारीने रक्कम घेतली होती.
    डोक्यावर कर्जाचा बोजा असताना शेतात टाकलेल्या पिकांचे निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान झाले होते. यामुळे उत्पन्न चांगले आले नाही. याशिवाय शेतमालाला भावही मिळत नसल्याने कर्ज कसे फेडायचे, या चिंतेत ते होते. या विवंचनेतून त्यांनी रविवार, २६ रोजी कीटकनाशक पिले. विष घेतल्याचा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर हिरालाल यांना लागलीच जळगाव येथे उपचारासाठी आणण्यात आले. दोन दिवसांपासून उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.