Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला १० वर्षे शिक्षा
    क्राईम

    अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला १० वर्षे शिक्षा

    editor deskBy editor deskJanuary 18, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या अरुण भगवान गवळी (रा. गुम्मी, जि. बुलढाणा) याला न्या. एस. आर. भांगडिया-झवर यांनी शुक्रवारी १० वर्षांची सक्त मजुरी व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

    मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील १४ वर्षीय मुलगी पाचोरा तालुक्यात तिच्या आजोबांकडे शिक्षणासाठी राहत होती. इयत्ता नववीमध्ये असताना २४ डिसेंबर २०१६ रोजी शाळेची वेळ संपल्यावरही ती घरी आली नव्हती. त्यामुळे तिच्या आजोबांनी तक्रार दिली होती. याचा तपास सुरू असताना याच दिवशी अरुण भगवान गवळी याने तिला रेल्वेने जळगाव येथे बोलावले व तिला घेवून त्याच्या बहीणीकडे गेला होता.

    रात्रभर तेथे थांबल्यानंतर गवळी याने मुलीला त्याच्या गावी व नंतर छत्रपती संभाजीनगर येथे घेवून गेला. तेथे मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत वारंवार तिच्याशी शारिरीक संबंध केले, त्यामुळे मुलगी गर्भवती झाली मुलगी गर्भवती राहिल्याविषयी गवळी याने या मुलीच्या आईला कळविले. त्यानंतर आई व इतर जण मुलीला घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे जात असतानाच ते आपल्याला मारतील या भितीने गवळी हा मुलीसह बेगमपुरा पोलिस ठाण्यात हजर झाला. तेथून पाचोरा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान मुलगी सहा आठवड्याची गर्भवती असल्याचे समोर आले. तसा वैद्यकीय पुरावा न्यायालयासमोर सादर करण्यात आला. डॉ. प्रवीण ठाकरे यांच्यासह पीडितेची मैत्रीण, पीडितेची मामी यांच्या साक्ष महत्त्वपूर्ण ठरल्या.

    सरकारपक्षातर्फे १० साक्षीदार तपासण्यात आले. युक्तिवाद पूर्ण होऊन न्या. एस. आर. भांगडिया- झवर यांनी अरुण गवळी यास भादंवि कलम ३७६ नुसार १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व २० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास, भादंवि कलम ३६३ नुसार दोन वर्षे सक्त मजुरी, एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास आठ दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026

    वेळ संपल्याने बँड बंद; पुन्हा वाजविण्यास नकार दिल्याने बँडमालकावर हल्ला !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.