Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ५५ वर्षीय महिलेचा पाय घसरला अन मृत्यू झाला !
    क्राईम

    ५५ वर्षीय महिलेचा पाय घसरला अन मृत्यू झाला !

    editor deskBy editor deskJanuary 16, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    पाय घसरून नाल्याच्या पाण्यात पडल्याने सीताबाई मस्तरिया बारेला (५५, मूळ रा. मध्य प्रदेश, ह. मु जळके, ता. जळगाव) या महिलेचा बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (१५ जानेवारी) दुपारी म्हसावद शिवारात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील बजारीया येथील रहिवासी असलेल्या सीताबाई बारेला व पती गेल्या तीन वर्षांपूर्वी रोजगारासाठी जळके शिवारात आले आहेत. शेतात मजुरी काम करून बारेला दाम्पत्य उदनिर्वाह करतात. सीताबाई म्हसावद शिवारात कामासाठी गेल्या असताना पाय घसरून त्या नाल्यात पडल्या व त्यांच्या नाकातोंडात पाणी गेले. ही घटना काही ग्रामस्थांच्या लक्षात आली व त्यांनी घटनेची माहिती महिलेच्या पतीला दिली. महिलेला बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत महिलेच्या पश्चात पती, चार मुले, चार मुली असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026

    वेळ संपल्याने बँड बंद; पुन्हा वाजविण्यास नकार दिल्याने बँडमालकावर हल्ला !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.