Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » हवेत गोळीबार करणारे संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद !
    क्राईम

    हवेत गोळीबार करणारे संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 9, 2025Updated:January 9, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल जवळ  मंगळवारी ७ जानेवारी रोजी रात्री अज्ञात व्यक्तींनी हवेत गोळीबार करत घरावर दगडफेक करण्यात आली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दुचाकीवरील अज्ञात ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी  दिली आहे.

    पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, सारंग अशोक बेलदार वय ४९ रा. पोतदार हायस्कूल चाळीसगाव याच्या घरासमोर मंगळवारी ७ जानेवारी रोजी ११.४५वाजेच्या सुमारास तीन दुचाकींवर सहा जण आले. सर्वांनी तोंडाला रूमाल बांधलेला होता. बुलेट मोटारसायकलवर मागे बसलेल्या एकान हवेत गोळीबार केला. तर सारंग बेलदार याच्या घराच्या पार्चमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीवर दगड टाकून नुकसान केले तर पार्च बाहेर काचेची बाटली फोडून शिवीगाळ करत दुचाकीवरून पसार झाले. हा गोळीबार जुन्या  वादातून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. गोळीबार करताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहे. गोळीबार करून संशयित आरोपी हे फरार होताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे.

    या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर दुसरीकडे पोलीसांनी संशयित आलेल्या संकेत उर्फ बाळू मोरे रा. हनुमान वाडी चाळीसगाव याच्या घराची झाडाझडती घेतली असता त्याच्या घरातून ६ जिवंत काडतूस, पिस्टल मॅगझीन, कोयता, गुप्ती, स्टील रॉड आणि बेसबॉल खेळण्याची लाकडी बॅट असा घातक हत्यारे मिळून आले आहे. या संदर्भात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. चाळीसगाव शहरातील या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.