Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुख्यमंत्र्यांनी सांगितले लाडक्या बहिणींना कधी मिळणार पैसे ?
    राजकारण

    मुख्यमंत्र्यांनी सांगितले लाडक्या बहिणींना कधी मिळणार पैसे ?

    editor deskBy editor deskDecember 19, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नागपूर : वृत्तसंस्था

    राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक लाडक्या बहिण टेन्शनमध्ये आले होते मात्र या लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी लाडकी बहिण योजनेविषयी मोठी भूमिका घेतली आहे.

    राज्यातील जनतेने बिनधास्त रहावे, कारण जी आश्वासने आम्ही दिली आहेत. ज्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत. त्यातील एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. विधानसभा निवडणुकीत जी योजना किंगमेकर ठरली ती लाडकी बहीण योजना कायम ठेवणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज विधानसभेत बोलताना दिले. विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज (दि.१९) चौथा दिवस आहे.

    “मी सर्वप्रथम महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेचे आभार मानतो की त्यांनी महायुतीला घवघवीत यश देत निवडून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या एक है तो सेफ है या नाऱ्याला महाराष्ट्राने मोठा प्रतिसाद दिला. यातून मोठा विजय महाराष्ट्राला प्राप्त झाला. महायुती काळात सुरू झालेल्या सर्व योजना कायम राबविले जातील”, असे आश्वासनदेखील देवेंद्र फडणवीस यांनी दिले.माहिती मंत्री
    पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं. त्यांच्यासाठी हे अधिवेशन संपल्यानंतर लगेचच आम्ही पुढील हप्ता जमा करणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना आज त्यांनी ही माहिती दिली. तत्पूर्वी हिवाळी अधिवेशनाचे कामकाज शनिवार, दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी पर्यंत चालणार असल्याची माहिती ‘माहिती मंत्री’ चंद्रकांत पाटील यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.

    “आज मी त्यांचे मनापासून आभार मानतो. ज्यांनी मला वारंवार टार्गेट केले. त्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेमध्ये माझ्याबद्दल सहानभुती दाखवली आणि महायुतीला ऐतिहासिक यश दिले. तसेच मागील ५ वर्षात मी जे काही काम केलं होते, ते जनतेने पाहिले होते. त्यामुळेच आम्हाला मोठा विजय झाल्याचेदेखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.