Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » …तेव्हा भुजबळ यांचा वापर करण्यात आला ; संजय राऊत
    राजकारण

    …तेव्हा भुजबळ यांचा वापर करण्यात आला ; संजय राऊत

    editor deskBy editor deskDecember 17, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील महायुतीच्या सरकारने अनेक दिग्गज मंत्र्यांना मंत्रीमंडळातून डच्चू दिल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे अनेक नेते देखील नाराज झाले आहे. तर विरोधक देखील आता सत्ताधाऱ्यावर टीकास्त्र सोडू लागले आहे. यात प्रामुख्याने ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

    छगन भुजबळ यांनी मनोज जलांगे पाटील यांच्या विषयी टोकाची भूमिका घेतली होती. त्यांनी तशी भूमिका घ्यायला नको होती, असे आमचे मत होते. मात्र आता त्यांना ही भूमिका घ्यायला लावली होती, असे दिसत असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे यांच्या विरोधात लढण्यासाठी भुजबळ यांचा वापर करण्यात आला, असा आरोप देखील त्यांनी केला. मात्र आता त्यांनी कितीही आदळउपट केली, अश्रू ढाळले तरी त्यांना कोणी विचारणार नाही. आता त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

    महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा राहावा या मताचे आम्ही सुरुवातीपासून आहे. भुजबळ यांनी त्यावेळी टोकाची भूमिका घेताना दिसत होते. मात्र त्यांच्या मागे एक अदृश्य शक्ती होती. त्याच शक्तीने त्यांना आता वाऱ्यावर सोडले आहे. जी अदृश्य शक्ती एकनाथ शिंदे यांच्या मागे होती, तीच शक्ती भुजबळ यांच्या मागे त्यावेळी होती. मात्र आता ती शक्ती त्यांच्या मागे नाही. त्यामुळेच त्यांचा बळी गेला, असे आमचे आकलन असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

    एक दोन आमदार नाराज झाले तरी या सरकारला तडा जाईल, अशी शक्यता दिसत नाही. त्यामुळे जे आमदार नाराज आहेत ते एक-दोन दिवस लढतील. नंतर त्यांच्या हातात खुळखुळा दिला जाईल आणि ते सर्व आमदार शांत होतील, अशीच शक्यता असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जे नग आहेत, नमुने आहेत, त्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यास करायला हवा, असा सल्ला देखील त्यांनी दिला. काही दिवसांपूर्वी त्यांच्याच विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांनी काय भूमिका घेतली होती? याचा अभ्यास त्यांनी करायला हवा. किती प्रकारच्या भ्रष्टाचाराचे आरोप आपण त्यांच्यावर केले होते? असा प्रश्न देखील राऊत यांनी विचारला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.