Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सिमेंटचा पोल अंगावर पडून १० वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू
    क्राईम

    सिमेंटचा पोल अंगावर पडून १० वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू

    editor deskBy editor deskNovember 28, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कजगाव : प्रतिनिधी

    शेतातील सिमेंटचा पोल अंगावर पडून १० वर्षीय बालकाचा करुण अंत झाला. ही घटना कनाशी, ता. भडगाव येथे मंगळवारी सकाळी घडली. दुर्दैव म्हणजे या बालकाचा ३० रोजी वाढदिवस साजरा होणार होता; त्या आधीच त्याचा असा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन महेंद्र महाले असे या मृत बालकाचे नाव आहे. कजगावपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कनाशी येथील रहिवासी, तसेच पाचोरा बस आगारात चालक महेंद्र महाले यांचा हर्षवर्धन मुलगा होता. तो कनाशी जि. प. शाळेत तिसरीत शिकत होता.

    हर्षवर्धन हा सकाळी शाळेत जाण्यासाठी तयार झाला होता. गणवेश घालून घराच्या ओट्यापर्यंत पोहोचला. त्यावेळी शेतात असलेली सायकल घेऊन शाळेत जाऊ या विचाराने तो शेताकडे गेला. त्याचवेळी शेतातील एक सिमेंटचा पोल या बालकाच्या अंगावर कोसळला आणि तो जागीच गतप्राण झाला. हा प्रकार परिसरातील शेतकऱ्यांच्या लक्षात येताच या बालकाच्या बचावासाठी ते धावले. मात्र, काही उपयोग होऊ शकला नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.