Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आनोरा शिवारातील पाटाच्या पाण्यात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला
    क्राईम

    आनोरा शिवारातील पाटाच्या पाण्यात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 13, 2022Updated:February 13, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील आनोरा शिवारात गिरणा नदीच्या पाठात एक अनोळखी तरूणाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    धरणगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील अनोरा शिवारात एका रेल्वे रुळाजवळ असलेल्या गिरणा नदीच्या पाटात १३ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अंदाजे ३५ वर्षीय अनोळखी तरूणाचा मृतदेह फुगलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत आनोरा गावाचे पोलीस पाटील भाऊसाहेब संभाजी पाटील यांनी तात्काळ धरणगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली. धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह पाण्याबाहेर काढून धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे. मयताची ओळख अद्यापपर्यंत पटलेली नसून याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.